Primary tabs

रायझिंग शटल क्वीन

share on:

ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडूंची कामगिरी ही निराशजनक राहिली. त्यातही काही नवोदित खेळाडूंनी भारताची खिंड लढविण्याची जिद्द कायम ठेवली. भारतीयांना ज्या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा होती, त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. अभिनव बिंद्रा, गगन नारंग, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, ललिता बाबर, लिएंडर पेस, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोणप्पा, दीपिकाकुमारी या दिग्गज खेळाडूंचे ऑलिम्पिकमधील आव्हान लगेच संपुष्टात आले. भारताची फुलराणी असलेल्या सायनालादेखील ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करता आली नाही. पुलेला गोपीचंद यांची साथ सोडल्यावर सायना पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उतरली. तिच्यामधील व तिच्या प्रशिक्षकातील संवादाचा अभाव तिच्या खेळावर दिसत होता. सुरुवातीच्या दोन मॅचेसमध्ये सायनाने उत्तम खेळ केला पण त्यानंतर तिला त्यात सातत्य कायम ठेवता आले नाही. भारतीय बॅडमिंटनमधील पुरूष-महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. पण बॅडमिंटनमध्ये महिला आणि पुरूष एकेरीतील आव्हान अजून दोन नवोदित खेळाडूंनी कायम ठेवले आहे. किदब्मी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू या दोघांची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी आहे. त्यांच्या खेळातील नावीन्य आणि योग्य तंत्रज्ञान याच्या जोरावर दोघांनाही उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दोघांनी उत्तम खेळ करत आगेकूच केली आणि बॅडमिंटनमधील पदकाची भारताची आशा कायम ठेवली. पी.व्ही. सिंधूने आशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.

रेकॉर्ड ब्रेक डे

सोमवारचा दिवस हा खरंतर ऑलिम्पिकच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक डे होता. मायकल फेल्प्सने आपलं 23 वं सुवर्णपदक मिळवून एक नवीन इतिहास रचला आणि त्याचवेळी ऑलिम्पिकमधून निवृत्तीही जाहीर केली. तर दुसरीकडे 'हॅमरथ्रो' या स्पर्धेत पोलंडच्या 31 वर्षीय अनिथा व्लोदारक्झिक हिने 82.29 मॉनस्टर लॉब पार करण्याचा नवा विक्रम करून तिने तिचा स्वत:चाच विक्रम मोडला आहे. ब्रहमासच्या धावपटू मिलर हिने 400 मीटर धावण्याची शर्यत 49.44 सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक मिळवले.

श्रुतिका जावळे. 

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response