Acanthosis nigricans

युवा लेख

युवा विवेक    24-Oct-2023   
Total Views |

 
Acanthosis nigricans

नमस्कार मित्रांनो! कसे आहात? निश्चितच आनंदात असाल आणि आनंदातच राहावे अशी माझी प्रार्थना आहे. आज एका वेगळ्याच विषयावर बोलायचे मी ठरवले आहे. मानेवर मागच्या बाजूला काळे डाग किंवा पूर्ण मान काळी पडण्याचा त्रास अनेकांना असतो. फक्त मानच नव्हे तर शरीरावरील इतरही काही भागाची स्किन काळी पडते. याला भाषेत Acanthosis nigricans असे म्हणतात.

किती स्त्रियांना आणि पुरुषांना हा प्रॉब्लेम आहे? Armpits, inner thigh, neck... ज्या ज्या भागात स्किन मध्ये folds असतात त्या भागात स्किन काळी पडणे, कडक होणे, rashes येणे किंवा खाज सुटणे... ही खूप कॉमन समस्या आहे.

याची ओबेसिटी, hormonal imblanaces, pregnancy, birth control pills, काही इतर hormonal tablets, insulin resistance, prediabetic or diabetic condition ही सर्व मुख्य कारणे आहेत.

या व्यतिरिक्त अंघोळ करताना नीट स्वच्छता करणे, सामान्य दर्जाचे परफ्यूम स्प्रे वापरणे, उन्हाचे अती प्रमाणात exposure ही कारणे सुद्धा महत्त्वाची आहेत.

एक आहारतज्ञ म्हणून सल्ला देताना मी सर्वात आधी हे सांगेन, की जर अशी लक्षणे दिसत असतील तर आधी underlying disease तर काही नाही ना, याची खात्री करून घ्या. म्हणजेच PCOD, thyroid, Pre menopause, किंवा इतर कोणत्याही कारणाने असलेला hormonal issue जर असेल तर त्याची चाचणी करून ट्रीटमेंट घ्या. ओबेसिटी असेल तर वजन किमान पाच ते सात किलो तरी कमी करा.

जर यापैकी काही नसेल तर व्हिटॅमिन डी ची कमतरता तर नाही ना, हे ब्लड टेस्ट करून चेक करा. असेल तर योग्य सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. व्हिटॅमिन डी खाण्यातून भरून काढणे खूप कठीण आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा कोवळ्या उन्हात अर्धा तास स्किन expose होईल असे कपडे घालून चालणे किंवा बसणे हा यावरचा सर्वात उत्तम उपाय आहे.

तेही नसेल तर मात्र आपलंच काहीतरी चुकतंय काळजी घेण्यात हे नक्की.

अंघोळ करताना फार घाई असेल तर हे सगळे भाग कधीकधी दुर्लक्षित राहण्याचा संभव असतो. म्हणूनच अंघोळ करताना मान आणि इतर काळसर झालेल्या स्किन वर आठवड्यातून किमान तीन वेळा चांगला क्रीम स्क्रब वापरून स्क्रबिंग करा. कधीकधी तेलाने मसाज करून मग अंघोळ करा. नंतर त्यावर एखादे skin lightening करणारे क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा. लिंबू, खाण्याचा सोडा... असल्या भानगडीत पडू नका. काहीही उपयोग होत नाही. Deo spray वापरता roll on deo वापरा. उन्हात बाहेर पडताना स्कार्फ वापरून मान झाकून घ्या. काही महिला स्कार्फ ऐवजी कॅप किंवा hat वापरतात. फक्त डोक्याचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी हे ठीक आहे. पण स्कार्फ गरज पडली तर पूर्ण चेहऱ्याला झाकण्यासाठी वापरता येतो. त्याने सगळे केस कव्हर होतात. मान कव्हर होते.

(Extra tips: स्कार्फ वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत सुंदर आणि फॅन्सी मिळतात. Look feminine दिसतो. आणि एकच स्कार्फ वीस प्रकारे गुंडळाता येतो! Search on YouTube)

आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. साखर पूर्णपणे वगळा. Processed food, refined carbs यांचा आहारात शक्यतो समावेश टाळा. नॉन व्हेज खात असाल तर शक्यतो मासे जास्त खा.

Trust the process... या समस्येपासून मुक्ती मिळण्यास वेळ लागतो. जे काही उपाय वर लिहिले आहेत ते सातत्याने करत राहावे लागतात. मात्र किमान सहा महिने या सगळ्या टिप्स फॉलो केल्यात तर अपेक्षित परिणाम नक्की दिसेल.

मला नक्कीच खात्री आहे की या लेखाचा फायदा अनेकांना होईल. कारण दुर्लक्षित जरी असला तरीही हा त्रास अनेकांना असतो. काही महिला यामुळे लाजून केस वर बांधत नाहीत कारण मान उघडी पडते. काही जणी standing collar वापरणे पसंत करतात. काही जणी गळ्यात स्कार्फ घेतात. मान दिसू नये म्हणून काळजी घेतात. फक्त स्त्रियांनाच नव्हे तर अनेक पुरुषांना सुद्धा हा त्रास असतो. वरील उपाय करून पहा. नक्की फायदा होईल.

- दीप्ती काबाडे