तू....

युवा विवेक    14-Mar-2023   
Total Views |


तू....
तू हळव्या ओल्या सरी
मी वारा होऊन येतो
तू थेंब पापणीवरी
मी गहिवर निथळत जातो
किती सांगू सखे प्रिये
अंतरात बरसून घेतो
या काळोखाच्या राती
मी ओल्या सरीत न्हातो
तू पुढ्यात सामोरी अशी
मन मोर नाचरा होतो
स्पर्श तुझा आभासी
का धुक्यात विरून जातो
लडिवाळ शोध असा हा
डोळ्यात दडवून घेतो
तू झुळूक लाडकी माझी
मनात दरवळ होतो
होवून वारा मी
तव केसात गुंतत जातो
गंध बावऱ्या श्वासास
खोल हृदयी माझ्या जपतो.
-अमिता पेठे पैठणकर