अदमासखिडकीतून डोकावू पाहणारे सोनकेशरी अंधार कवडसे..तिथूनच वरती चढलेली सायलीची वेल ..नि दिवसभराच्या सोसल्या उन्हाने मलूल होत जाणारी तिची इवली फुलं.. गळणार की तिथेच देठांशी जोडले राहून सुकणार.. या द्वंद्वात अडकलेली असताना..माझ्या मात्र हातात ...वाफाळत्या ..
पूर्णापूर्णत्वाचा उंबरठासोनचाफ्याची ओंजळ घेऊन अवघडलेलं.. खोळंबलेलं अर्ध-उणं अस्तित्व! शांत करतं की उमाळे भरून आणतं आसुसलेपणाचे.. कुणास ठाऊक !?..
अंतराळ हाकाकेंद्र केंद्रक की केंद्रबिंदू ठरू पाहतोय की होऊ पाहतोय ? अंतराळात साद घालून ठेवलीय ! बघू.. कशावर तरी आदळेलच.. नि येईल परावर्तीत होउन परत आपल्यापर्यंत.. तेंव्हाच कळतील.. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे....
मनाचिये गुंती गुंफियला शेला - 2जितकं कोमल तितकंच बलदंड! पराकोटीचा विरोधाभास सहज सामावून घेत आणि कोणतंही निश्चित स्वरूप नसताना स्वतःचं अस्तित्व जितकं बेमालूम तितकच ठामपणे अधोरेखित करणारं रसायन म्हणजे मन! कदाचित म्हणूनच माउलींनी मनाचिये गुंती गुंफियेला शेला असं म्हणत मनाच्या ..
हुळहुळत्या काठानेत्या शपथे खातर हे सारं.. की, तळ्यालाही हवा आहे शपथेचा काठ जिथे बसतय कुणीतरी येऊन जन्मोन जन्म इच्छेचे खडे भिरकावत....
स्वतः ला काही सांगूया का?होईल पानगळ.. होऊदे... गळतील फुले.. गळू देत धरतील फळे.. धरुदेत अर्धे कच्चे.. तोडेल कोणी.. तोडू देत उरली सुरली पिकतील छान.. उष्टावतील बिया पडतील खाली.. रुजतील पुन्हा .. प्रवास होईल सुरू नवा.. कृत्रिम थोडे सोडून देऊन..
वेळी अवेळी माझे असे झाड होते..उगाच आभाळ भरून येते उगाच पाऊस कोसळत ऱ्हातो उगाच जीवाची घालमेल होते उगाच गहिवर ओला होतो पुन्हा पुन्हा तेच ते घडत ऱ्हाते अंधारून आलेल्या दिशा, हवा हवासा तरी नकोसा तोच तो गार वारा..
बदलूयात का भूमिका ? कधी आवेग धारण करून, कधी संथ होउन, कधी मातृत्व स्वीकारत सुख दायीनी होऊन.. कधी रौद्र रूपही अंगी लेवून.. वाहून,वाहत राहून थकलेय मी अता!..
चिंतनाच्या पोहऱ्यातून..रहाटाच्या विहिरीवर दोराला पाणी काढण्यासाठी पोहरा बांधलेला असतो तहान भागवण्यासाठी आपल्याला तो रहाट उलट बाजूने फिरवून पोहरा पाण्यात सोडायचा, नि पोहरा पाण्यावर पडला की, हातांच्या विशिष्ट हालचाली करून हिसका असा द्यायचा असतो ज्याने पोहरा पाण्यात बुडेल. ..
चेहरे त्यांची एक गंमतच असते, कधी निरखून पाहिलंय त्यांना? गर्दीत आपलं लक्ष नसतं पण कधी लक्ष दिलं तर भारी गंमत असते ती! आपलं तर असं आहे की जी व्यक्ती ज्या पेहरावात असते त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला पाहून त्यांच्याच भाषेत किंवा त्यांच्याच बोलीत त्यांच्या ..
भैरवीकातरवेळ एकीकडे जीव पोखरत असताना, मनाची नाव प्रचंड हेलकावे घेत असताना, स्वप्न वास्तवाच्या काठावर बसून तोल सावरत आसताना.. अस्ताला जाता जाता दिनमणी सांजेवर जांभळी माया पांघरवत असताना... बऱ्याचशा द्विधा मनस्थितीत मी चालत राहते चिंचोळी पाऊलवाट..पाऊल ..
ग्रेस वेड लावतोहे गाणं ऐकताना तरंगायला होतं काही ओळींवर मन भरून येतं कुठे हळवी जाणीव देतं अजूनही प्रत्येक वेळी नवं वाटतं काहीतरी शोधायला भाग पाडतं आणि मी पुन्हा पुन्हा या गाण्याच्या प्रेमात पडते,वेड्यासारखी .. ग्रेस मला आजन्म सापडू नये कारण त्याला शोधण्याचा ..
मनाचिये गुंतीमनाच्या अंतरंगातले असंख्य भाव द्वैताद्वैताच्या पलीकडे नेणारे अनेक दुवे,धागे, मानवी मनात झालेले गुंता सोडवायला एक ना अनेक जन्मही अपुरे पडतील.. मानवी मनाच्या शेल्याची एक विण उकलत नाही तोवर दुसरीकडे ओढ बसलेली असते....
मनाचिये गुंती गुफियेला शेलामाझ्या मनाचा पसारा अजूनच वेगळा.. कुठल्याशा गुढाच्या ओढीने अख्खा जीव ओढला जाणारा.. तसं पहायला गेलं तर पहाट शांत तरी चलबीचल, स्थिर तरी चंचल असते त्यातही कर्तिकातली पहाट अगदीच गारूड करुन असते मनावर धुकं भरल्या संदिग्ध वेळा, वाटा मनाला नजाणो कुठल्या ..
तेजोमय!शेणाने सारवलेले हिरवेगार अंगण, अंगणाच्या मधोमध उभे वृंदावन, चारी बाजूने सोडलेल्या दिव्यांच्या देवळ्या, त्यात मंद तेवणाऱ्या पणत्या आणि पहाटसमयी अभ्यंगानंतर घरच्या लेकिबाळींनी ओसरी, ओटा,अंगणाच्या चौफेर तेज्याचे दिवे ओळीने मांडावेत त्यात त्यांचे चेहरेही ..
झाडांशी निजलो आपण...आर्तता आणि प्रचंड गूढता जो ग्रेसांच्या लेखनाचा स्थायी भाव आहे तो ओढ लावत गेला. शब्दांचे शब्दशः अर्थ आणि त्यामागचे गर्भितार्थ हा वेडा छंद मला या गाण्याने लावला. माझ्या मते जगण्याचा सार म्हणजे हे गाणं आहे. इथे गीतात काही ओळी कमी आहेत पण मूळ कविता ..
प्रसन्न सकाळ...रोज नवा पाहुणा आमच्या गॅलरीतल्या खिडकीत असतो सकाळच्या गरव्यामुळे खिडक्या बंद असतात. त्याचा एक फायदा असा होतो की काचेच्या बाहेरून पक्षी, पिल्लं येऊन बसतात, काचेत त्यांना त्यांचंच प्रतिबिंब दिसतं. न जाणो त्यांना काय वाटतं स्वतःलाच पाहून ते टक् टक् ..
ऑल अबाउट नथ!'नथीशिवाय बाईचा शृंगार पूर्ण होत नाही' म्हणजे काय हो....! तर नथ म्हणजे ' बाणा'आणि तिचा गुण म्हणजे 'करारीपणा' असे मला तरी वाटते. प्रत्येक दागिन्यांचा स्वतःचा आपला असा वेगळा डौल असतो. प्रत्येक दागिन्यांला स्वतःचा एक सुंदर गुण आणि अर्थ असतो. ..
धेय्यासक्तीकापल्या गेल्या मुळातनं स्त्रवतंय बरंच काही..कोंभारून येणं,बहर फुलांचा,फळांचा..की प्राण..तांबूस फुटू पाहणाऱ्या नवतीच्या नजाकतिचा,शिशिरातली पानगळीचा..श्रावणातल्या हिरवेपणाचा,किंवाशोषलेलं सर्व काही अगदी.. श्वास आणि ऊनसुद्धा स्त्रवत असणार त्यातनंमूळं ..
पावसा... सनातन पावसा विचारू का तुला..मनाला पडणारे बाळबोध प्रश्न ?कधीपासून कोसळतो आहेस?कधीपासून मुरतो, पाझरतो झिरपतो, तिच्या रंध्रा, रोमा, देहात खोलवर हक्क सांगतो आहेस?तिच्या घमघमत्या वेणीत मल्हार माळून झुलवतो आहेस?कधीपासून ताटकळवलंस कसल्याशा ..