ताप आणि आहार

युवा विवेक    06-Jun-2023   
Total Views |

 
ताप आणि आहार

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हजर होते आहे एक आगळा वेगळा विषय घेऊन. ताप येण्याचा त्रास आपल्या सर्वांना कधी न कधी होतोच ना? त्याच तापाबद्दल आज जास्त माहिती जाणून घेऊया. आणि ताप आला असेल तर आहार कसा ठेवावा, ताप येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे सुद्धा पाहूया.

आपण नेहमीच ऐकतो की ताप येणे हा स्वतः आजार नाही, ते फक्त रोगाचे लक्षण आहे. परंतु आलेला ताप गंभीर रोगामुळे आहे की एखाद्या तात्पुरत्या स्वरूपाच्या इन्फेक्शन मुळे हे ओळखणे खूप सोपे आहे.

उदाहरणार्थ, जास्त काळ टिकणारे गंभीर रोग जसे की कॅन्सर किंवा एड्स, अशा रोगांमध्ये अचानक खूप ताप येत नाही. जेव्हा रोग वाढू लागतो तेव्हाच हलकी कणकण जाणवते. तो ताप इतकाच असतो जो सहन होऊ शकेल. शिवाय कितीही तापाची औषधे घेतली तरीही तो पूर्ण जात नाही. शरीरात सतत कणकण राहते.

याउलट एखादे इन्फेक्शन झाले असेल तर मात्र एकदम अचानक भरपूर ताप चढतो. कपाळ प्रचंड तापते. माणसाची शक्ती चटकन कमी होते. गळून गेल्यासारखे वाटते. झोपून राहावे वाटते, आराम करावा वाटतो. म्हणजेच इन्फेक्शन मध्ये येणारा ताप सहन होणारा नसतो. तापाचे औषध घेतले की चटकन ताप उतरतो आणि पुन्हा चार तासांच्या अंतराने चढू लागतो.

दोन प्रकारचे इन्फेक्शन शरीरात होऊ शकते. बॅक्टरिया मार्फत किंवा व्हायरस मार्फत. यापैकी बॅक्टरीया मार्फत होणारे इन्फेक्शन जास्त काळ टिकते आणि त्यावर जास्त काळ चालणारी ट्रीटमेंट घ्यावी लागते. उदाहरणार्थ टीबी.

याउलट व्हायरस मार्फत होणारे इन्फेक्शन काही दिवस टिकते आणि त्यावर कमी दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते. उदाहरण कॉमन सर्दी किंवा कॉमन व्हायरल ताप. याशिवाय शरीरातील internal organs वर जर viruses किंवा bacteria चा हल्ला झाला तर त्या त्या अवयवाला इन्फेक्शन होते. उदाहरण, urin infection, intestine infection, lungs infection, eye infection इत्यादी.

कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरस पासून वाचण्यासाठी शरीराकडे जी शक्ती असते तिला immunity म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. या शक्तीचे दोन भाग पडतात.



1. बाहेरून येणाऱ्या pathogens ना चटकन ओळखून तिथल्या तिथे त्यांचा खात्मा करणारी यंत्रणा:

सोप्या भाषेत सांगायचे तर शरीरात नेहमीच उपलब्ध असणारे वेगवेगळे अडथळे!

पहिला मोठा अडथळा म्हणजे आपली त्वचा. ही त्वचा ओलांडून जाण्यासाठी व्हायरस किंवा बॅक्टेरीया ला कष्ट पडतात. म्हणूनच त्वचा निरोगी असणे गरजेचे आहे. ती निरोगी नसेल तर pathogens ना आमंत्रण देते.

दुसरा अडथळा म्हणजे तोंडामध्ये असणारे बॅक्टरीया, पोटातले acids, इत्यादी. बऱ्याच प्रमाणात यातच pathogens चा खात्मा होतो.



2. इन्फेक्शन झाल्यावर जागी होणारी यंत्रणा:

ही जरा सावकाश चालणारी प्रोसेस असली तरी शरीराला recover करण्यासाठी “जी जान” लावणारी प्रक्रिया आहे. यातही दोन वेगवेगळ्या प्रकारे काम चालते.

पहिल्या यंत्रणेने आपले काम नीट केले नाही आणि pathogens ना शरीरात प्रवेश मिळालाच तर ते एका क्षणाचाही विलंब न करता शरीरातील वेगवेगळ्या पेशींवर हल्ले चढवू लागतात. पेशीत शिरकाव मिळाला की ती पेशी pathogen ची गुलाम बनते. नेहमीचे कार्य विसरून विचित्र वागू लागते. असे वेगाने घडू लागले की दुसरी यंत्रणा जागी होते आणि दोन मार्गांनी कामाला लागते.

1. शरीरात काही खास प्रकारचे toxin बनवून त्याद्वारे pathogens ना मारून टाकणं:

ही क्रिया म्हणजेच शरीरात बनणाऱ्या antibodies. या आपल्यासाठी चांगल्या असल्या तरी pathogens साठी टॉक्सीनच असतात!

ब) ज्या पेशींना ऑलरेडी pathogens ने स्वतचे गुलाम बनवले आहे त्या पेशींना मारून टाकणं:

कारण या पेशी पुन्हा पूर्ववत होऊ शकत नसतात. त्या शरीरात राहिल्या तर आणखी पेशींना त्रास देऊ शकतात. म्हणून त्या मरणे गरजेचे असते.

हे सगळे युद्ध शरीरात सुरू असताना शरीराचे तापमान वाढते आणि म्हणूनच भरपूर ताप येतो.

कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणे निरोगी माणसासाठी थोडे कठीण असते. कारण त्याची रोगप्रतिकारकशक्ती चांगली कार्यरत असते. मात्र ज्यांना आधीच एखादी व्याधी आहे जसे की कॅन्सर रुग्ण, किंवा डायबेटिस चे रुग्ण, अशांना इन्फेक्शन लवकर पकडते

आणखी एका प्रकारच्या लोकांना इन्फेक्शन लवकर होऊ शकते. ते लोक ज्यांचे Nutrition status उत्तम नाही. म्हणजेच ज्यांच्या आहारातून पुरेसे nutrition त्यांना न मिळाल्याने शरीरात वेगवेगळ्या घटकांच्या deficiency आहेत, असे लोक. यासाठीच आपल्या आहारात सर्व प्रकारच्या फूड ग्रुप चा समावेश असायला हवा.

अगदी वेट लॉस करताना सुद्धा मी सर्व प्रकारचे खाद्य आहारात राहील याची काटेकोरपणे काळजी घेते. माझे जे क्लाएंट हे वाचत असतील त्यांनी आठवून पहावे... कडधान्ये, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी धान्ये, डाळी, सलाड या सगळ्याचा दर आठवड्यात समावेश असतो आणि दर आठवड्याला विविधता असते. याचे हेच मुख्य कारण आहे की वेट लॉस करताना काही deficiency शरीरात तयार होऊ नयेत. याचा परिणाम असा दिसतो की वजन कमी झाले तरीही स्किन खराब होणे, केस गळणे, अशक्तपणा वाटणे अशा गोष्टी होत नाहीत. उलट स्किन सुधारते, पचन सुधारते, एनर्जी वाढते... यालाच म्हणतात संतुलित आहार.

म्हणूनच वेगवेगळ्या रोगांपासून वाचण्यासाठी आपला आहार नेहमी संतुलित असायला हवा. Keto diet, GM diet, Paleo diet असे जे वेगवेगळे डाएट आहेत त्यात काही फूड ग्रुप वगळलेले असतात, म्हणूनच कालांतराने त्याचा त्रास होतो किंवा नव्या व्याधी मागे लागतात..

आशा आहे की आजचा विषय तुम्हाला आवडला असेल. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नव्या विषयासह.

Till then stay healthy be happy

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ