समन्वय

युवा कविता

युवा विवेक    11-Aug-2023   
Total Views |

समन्वय

सूर्यास का कधी

रजनी समजली

चंद्रास नाहीच

प्रकाशवेळ उमजली

सत्यास कधी

असत्य न पचले

असत्यास परि

न सत्य समजले

परि अंधाराविण

काय प्रकाशाचे गम्य

असत्याच्या विण

कैसे सत्याचे अस्तित्व

गरीबाच्याविण

श्रीमंत कैसा मोठा

नफ्याच्या अभावी

होईल कैसा तोटा

समन्वयाची भूमिका

श्रेष्ठ म्हणूनच नित्य

तोल सांभाळण्याचे

जीवनी करावे अगत्य

- अनीश जोशी.