कोविड आणि वेटगेन

युवा विवेक    01-Jan-1900   
Total Views |

 

 

  कोविड आणि वेटगेन

 

नमस्कार मित्रांनो. कसे आहात?आज आपली पुन्हा एकदा भेट होते आहे एका अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन.Covid ची पहिली लाट 2020 मध्ये आली होती.मात्र त्यानंतर आपल्या सर्वांच्याच आयुष्यातअनेक बदल झालेत.दोन्ही लाटांमध्ये अनेकांना हा रोग झाला.कित्येकांनी आपल्या जवळच्या माणसांना कायमचे गमावले.काहींनी महत्प्रयासाने या रोगावरविजय मिळवला. मात्र ज्यांना हा रोग होण्याआधी काहीही समस्या किंवा तब्येतीच्या अडचणी नव्हत्या त्यांच्या बाबतीत काही निरीक्षणे आढळून आली आहेत. म्हणूनच आजचा विषय covid वर मात केलेल्या रुग्णांसाठी आहे.

होय, हा लेख अशांसाठी ज्यांना कोविड होऊन गेला आहे. माझ्या पाहण्यात अशा असंख्य केसेस आल्या आहेत ज्यांचे कोविड होऊन गेल्यानंतर खूप वेगाने वजन वाढले आहे. फक्त वजन नाहीतर कोलेस्टेरॉल वाढले आहे. Hb1Ac वाढलेआहे, काहींना डायबेटीस डिटेक्ट झाले आहे तर काही prediabetic परिस्थितीत आहेत. काही लोकांना minor cardiac प्रॉब्लेम्ससुद्धा आढळले आहेत.

या सगळ्याचे कारण कोविड आहे. कारण कोविडचा विषाणू व्यक्तीच्या पचन संस्थेवर परिणाम करतो. मेटबॉलिझम बिघडली कीफॅट्स वाढणे ओघाने आलेच! एकदा वजन वाढू लागले की कोलेस्टेरॉल आणि इतर इश्यु मागाहून येतात.

ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्याप्रत्येकाने काही काळापर्यंत नियमित ब्लडटेस्टस करवून घेत राहा. जमल्यास ecg सुद्धा काढून घ्या एकदा.

आता राहिला प्रश्न वजनाचा... तरही वजन वाढ चुकीच्या लाइफस्टाइलमुळे किंवा चुकीच्या खाद्यपद्धतीमुळे झालेली नाहीच आहे. ती झाली आहे. हार्मोनल बिघाड आणि पचनातल्या बिघाडामुळे! ज्यांचे वजन कोविडनंतर अचानकपणे खूप वाढले आहे. त्याप्रत्येकाला काही अंशी sleep disturbance जाणवत असेलच! म्हणजे झोप वेळेवर न लागणे, लागली तरी मध्येच जाग येऊन झोपच उडून जाणे, सकाळी उशिरापर्यंत झोपले तरीही उठल्यावर फ्रेश न वाटणे... ही सगळी लक्षणे आहेत की कोविडनंतर तुमच्या हार्मोन्समध्ये बिघाड झालेला आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नुसते डाएटमध्ये बदल केल्याने, खाद्यपदार्थ बदलल्याने, प्रमाण कमी केल्याने वजन कमी होणार नाही. शरीरात झालेले बिघाड दूर करणे आधी गरजेचे आहे. त्यासाठी detox थेरपी अप्रतिम काम करते, याचा अनुभव अनेक क्लाएंट्सने घेतला आहे.

रोजच्या रोज भरपूर पाणी, फळे, सॅलडयांच्या नियमित सेवनाने शरीरातील बिघडलेले हार्मोन्स सुधारू शकतात. कृपया कोविडनंतर keto diet, paleo diet, intermittent fasting, GM diet, असे कोणतेही extreeme डाएट करू नका. वजन कमी करण्याचा स्पीड कमी ठेवा आणि पोषणतत्वांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

कोविडला हलक्यात घेऊ नका, त्याने अनेकांची आयुष्ये उध्वस्त केली आहेत.

परंतु आता जग स्थिरस्थावर होत आहे.या रोगाने केलेले काही दुष्परिणाम,औषधांनी झालेले काही दुष्परिणाम अनेकांना आढळून येत आहेत.तरीही सजग राहाल तर या सगळ्यांवर सहज मात करू शकाल.काळजी घ्या….

पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नव्या विषयासह.

Till then stay healthy be happy

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ