गुरूचा उपग्रह युरोपावर खोल समुद्रातील ज्वालामुखी असू शकतात

युवा विवेक    03-Jun-2021   
Total Views |

jupiter_1  H x  
गुरूचा उपग्रह 'युरोपा' याच्यावर खोल समुद्रातील ज्वालामुखी असू शकतात. गुरूचा उपग्रह 'युरोपा' हा जीवसृष्टीच्या उत्पत्तीसाठी, वैज्ञानिकांच्या विचारांपेक्षा अधिक योग्य आहे, असे संशोधनामधून पुढे आलेले आहे. नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार, युरोपाच्या पृष्ठभागाखाली १९४०-मैल (३२१० किलोमीटर) रुंद अशा आकारात सक्रिय ज्वालामुखी असण्याची शक्यता आहे. याच ज्वालामुखींमुळे तयार झालेल्या पृष्ठभागाच्या तळाशी खाऱ्या पाण्याचे समुद्र असू शकतात. असे ज्वालामुखी हे याच समुद्रातील रासायनिक प्रणालींना सक्रिय करू शकतात. यामुळे काही रासायनिक प्रक्रिया होऊन जीवनोपयोगी मूलद्रव्ये तयार होऊन कदाचित जीवनाची सुरुवात युरोपावर झालेली असू शकते अथवा भविष्यात होऊ शकते. झेक प्रजासत्ताकातील चार्ल्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासिका मेरी बॅहॉनकोव्ह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या निष्कर्षांवरून असा अतिरिक्त पुरावा उपलब्ध झाला आहे की, युरोपाच्या पृष्ठभागाखालील महासागरात जीवसृष्टीच्या उदयासाठी उपयुक्त वातावरण असू शकेल. युरोपा हा एक दुर्मिळ उपग्रह आहे. ज्यावर कदाचित कोट्यवधी वर्षांपासून ज्वालामुखीची क्रिया चालू असेल आणि बहुदा पृथ्वीच्या पलीकडे एकमेव असा जलसाठा, हा या युरोपावर आहे.
बॅहॉनकोव्ह आणि तिच्या सहकाऱ्यांनी गुरूच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे युरोपाचे आतले भाग कसे वर आले आणि ताणले गेले याबद्दल तपशीलवार माहिती या निवेदनात दिलेली आहे. अशा बलामुळे घर्षण आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते, ज्यामुळे युरोपाच्या पृष्ठभागाखाली असलेल्या समुद्राला अतिशीत होण्यापासून रोखले गेले असेल, आणि त्यामुळेच कदाचित युरोपाच्याच्या खडकाळ आवरणातील वरचा थर अर्धवट वितळलेला असू शकेल, असे संशोधकांनी अभ्यासात म्हटले आहे. अशा वितळण्यामुळे युरोपच्या सुरुवातीपासूनच तेथील पृष्ठभागाखालील समुद्राच्या ज्वालामुखींना इंधन मिळाले असेल. ज्वालामुखीय क्रिया बहुधा युरोपाच्या ध्रुवांजवळ जास्त प्रमाणात आहेत जिथे अंतर्गत उष्णतेचे प्रमाण अत्याधिक असते. हे संशोधन जियोफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये डिसेंबरमध्ये प्रकाशित झाले होते.जोव्हियन या उपग्रहावरील ज्वालामुखी इतके मोठे नसावेत. युरोपाप्रमाणेच गुरूचा एक गॅलिलियन उपग्रह, आयओ, हा ज्वालामुखीय दृष्टीने सौरमंडळात सर्वांत सक्रिय आहे. ज्याप्रमाणे युरोपावर उद्रेक होतात त्याच प्रमाणे या उपग्रहावरील ज्वालामुखीय उद्रेक हे गुरुत्वीय घर्षण आणि ताणामुळे होत असतात. 'आयओ'चा अंतर्गत पृष्ठभाग अधिक नाट्यमयपणे चिकटून आहे. कारण हा उपग्रह युरोपाच्या तुलनेत बृगुरूच्या अधिक जवळून परिभ्रमण आहे. दशकभर किंवा त्याहून अधिक काळानंतर, नासाच्या युरोपा-क्लिपर या मोहिमेच्या नंतर संशोधक, नवीन डेटाच्या साह्याने युरोपच्या एका कृत्रिम संगणकीय मॉडेलची चाचणी घेण्यास आणि वरील संशोधनाचा पाठपुरावा करण्यास सक्षम असतील. क्लिपर हे यान २०२४ मध्ये पृथ्वीवरून उड्डाण करेल आणि २०३० मध्ये ते गुरूच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर युरोपाच्या पृष्ठभागाच्या समुद्राची वैशिष्ठ्ये जाणून घेणे, त्याच्या बर्फाच्छादित पृष्ठभागाचा अभ्यास करणे आणि पुढील मोहिमांतील याने उतरवण्यासाठी युरोपावर उत्तम जागा शोधणे, अशी या मोहिमेची उद्दिष्टे असतील. क्लिपरच्या काही निरीक्षणामुळे संशोधकांना, ज्वालामुखी खरंच युरोपाच्या समुद्राच्या तळाशी सक्रिय आहेत की, नाही हे तपासण्यास मदत होईल. तसेच, या भूगर्भीय समुद्रांच्या लाल-नारिंगी रंगांना हेच विरघळलेले दगड कारणीभूत आहेत की आणखी काही हे देखील समजण्यास वैज्ञानिकांना मदत होणार होईल. मानवाच्या या अंतराळ उत्सुकतेमुळे येते युग हे स्पेसयुग असणार हे मात्र नक्की.
- अक्षय भिडे