सुधा मूर्ती

युवा लेख

युवा विवेक    23-Nov-2023   
Total Views |

सुधा मूर्ती

स्त्री ही अनेक नव्या क्षेत्रांत उतरली ती मोठ्या धाडसाने आणि प्रत्येक क्षेत्रांत आपला विशेष असा ठसा उमटवला. अभियांत्रिकी क्षेत्राचासुद्धा ईथे अपवाद नव्हता. जेव्हा. 'ती'ने ठरवलं तेव्हा तिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि ती पहिली महिला इंजिनीयर झाली. त्या पहिल्या महिला अभियंता म्हणजे सुधा मूर्ती. सुधा मूर्ती म्हणजे साधेपणा. बोलण्यातला, वागण्यातला, राहण्यातला एक सुंदर साधेपणा म्हणजे सुधा मूर्ती.

१९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील शिग्गाव या छोट्या गावात विमल कुळकर्णींच्या पोटी त्यांचा जन्म झाला. डॉ. आर. एच. कुळकर्णी हे त्यांचे वडील होते. सुधा मूर्ती या लहानपणी आपल्या आजी-आजोबांबरोबर एका खेडेगावात राहायच्या. पुढे त्यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रीकची पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथून त्यांनी संगणक शास्त्रात एम.ई.ची पदवी प्राप्त केली. कॉम्प्यूटर सायन्स या विषयातील एम.टेकची पदवीही त्यांच्याकडे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टेल्को कंपनीत संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून काम करायला सुरूवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. त्यांनी पुणे, मुंबई, जमशेदपूर येथे टाटा कंपनीसाठी काम केलं आहे. पुण्याच्या ख्राइस्ट कॉलेजमधे त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलेले आहे. याशिवाय बंगलोर महाविद्यालयात त्यांनी अभ्यागत प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. पुढे त्यांचा नारायण मूर्तींशी विवाह झाला. नारायण मूर्तींनी जेव्हा 'इन्फोसिस' ही कंपनी सुरु करायचं ठरवलं तेव्हा त्या टाटा कंपनीत नोकरी करत होत्या. तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन इन्फोसिसच्या उभारणीत मदत केली. पुढे त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा झाल्या. इन्फोसिस फाऊंडेशनच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात. त्यांचं समाजकार्यातलं योगदान फार मोठं आहे. अनेक शाळांमधे त्यांनी संगणक आणि ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सुधा मूर्ती यांची एक विशेष ओळख आहे ती लेखिकेची. त्या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतून लेखन करतात. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 'आजीच्या पोतडीतल्या गोष्टी' हे त्यांचं पुस्तक लहान मुलांच्या गोष्टींचं असुन महश्वेता ही कादंबरी आहे. त्याचबरोबर, 'अस्तित्व', 'आयुष्याचे धडे गिरवताना', 'परिधी', 'पुण्यभूमी भारत', 'बकुळ', 'वाइज अँड अदरवाइज', अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनेक भाषांमधे अनुवाद झाले आहेत. त्यांना भेटलेली माणसं, त्यांचे अनुभव त्यांनी सहजतेने त्यांच्या लेखनातून मांडले आहेत. ११९५ मधे 'उत्तम शिक्षक पुरस्कार', २००६ साली आर.के.नारायण पुरस्कार, एम.आय.टी. कॉलेजकडून 'भारत अस्मिता पुरस्कार', २००४ रोजी 'राजलक्ष्मी पुरस्कार' व असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. २००६ मधे भारत सरकारचा 'पद्मश्री पुरस्कार'ही त्यांना मिळाला आहे. असे आणि याहुनही मोठे असे त्यांचे कार्य आहे.

साधेपणाचा एक प्रेरक आविष्कार असलेल्या सुधा मूर्तींना सादर वंदन.

- अनीश जोशी.