Pre-workout meal

युवा लेख

युवा विवेक    28-Nov-2023   
Total Views |

Pre-workout meal

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? सर्वात आधी मी तुम्हाला एक किस्सा सांगते.

दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका जुन्या महिला क्लाएंटशी बोलणे झाले. त्या राष्ट्रीय स्तरावर बास्केट बॉल खेळतात. काही दिवसांनी सामने आहेत म्हणून सध्या practice जोरदार सुरू आहे. शिवाय जिम मध्ये खूप कठीण आणि हेवी व्यायाम करतात, त्या स्वतः cardio trainer सुद्धा आहेत. त्यांनी एक कंप्लेंट केली की, आजकाल बास्केट बॉल खेळताना पाय खूप दुखतात आणि नीट खेळता येत नाही. मी विचारलं व्यायामाआधी काय खाऊन जाता? तर म्हणाल्या फक्त दूध!

फक्त दूध पुरेसं नाही हे ओळखून मी त्यांना एक केळे, थोडे ड्राय फ्रूट आणि दूध इतकं सगळं खाऊन जाण्यास सांगितले. या तिन्ही मध्ये केळे सर्वात जास्त महत्वाचे आहे.

खूप जणांचा समज असतो की, व्यायामात स्नायू वापरले जातात, त्यामुळे व्यायामाआधी प्रोटीन्स खाणे गरजेचे आहे. मात्र प्रोटीन इतकीच गरज carbs ची सुद्धा असते. कारण एनर्जीचा खरा सोर्स तोच आहे.

सायंटिफिक भाषेत समजावते. सकाळी carbs घेतले की ते त्वरित वापरले जाता आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये glycogen रूपात साठवले जातात. सर्वच स्नायूंमध्ये अशा प्रकारे carbs साठवण्याची क्षमता असते. जेव्हा व्यायाम केला जातो तेव्हा जो स्नायू आपण वापरतो त्यातील glycogen ब्रेक होते आणि carbs मोकळे होतात. Carbohydrate त्या रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. जेव्हा या carbohydrate चे विघटन होते, तेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी बनते. हे बनत असताना उष्णता तयार होते आणि ही उष्णता स्नायूंमध्ये असणाऱ्या ADP रेणू मध्ये शोषली जाते आणि त्यांचे ATP रेणू बनतात. त्यानंतर त्वरित ATP मधून हीच उष्णता ऊर्जेच्या रुपात बाहेर पडून स्नायूंना पुरवली जाते आणि स्नायू त्या ऊर्जेचा वापर करून हालचाल करतात.

वाचताना फार मोठी प्रोसेस वाटली तरी सेकंदाच्या आत या सगळ्या स्टेप्स घडत असतात. मात्र हे वाचताना एक लक्षात आले असेल तर ही प्रोसेस नीट घडण्यासाठी स्नायूंमध्ये glycogen साठा असणे किती गरजेचे आहे! जर नसेल तर?

समजा तुम्ही फक्त प्रोटीन्स खाल्ले आणि carbs खाणे टाळले तर glycogen साठा शक्य होत नाही. आणि स्नायू वापरताना लागणारी ऊर्जा carbs च्या अभावामुळे स्नायूंच्या प्रोटीनचे विघटन होऊन तयार केली जाते आणि त्याच्या प्रभावाखाली तो स्नायू हालचाल करतो. म्हणजे थोडक्यात ज्या स्नायुला मजबूत करण्यासाठी व्यायाम सुरू असतो, तो मजबूत होता उलट ब्रेक होतो. (म्हणूनच व्यायामानंतर त्वरित प्रोटीन घेतले जाते, ज्यामुळे ब्रेक झालेले स्नायू पुन्हा भरून निघावेत. परंतु जे त्वरित प्रोटीन घेत नाहीत त्यांचे स्नायू भरून निघायला वेळ लागतो) व्यायाम खूपच हेवी असेल तर स्नायू फाटू शकतात.

याचमुळे जर तुम्ही वेट लिफ्टींग, किंवा इतर कोणताही कठीण व्यायाम प्रकार जसे की बॉक्सिंग, MMA, कराटे असे काहीही करत असाल तर pre-workout meal मध्ये carbs नक्की घ्या.

कसा वाटला आजचा विषय? मला आशा आहे की नक्की आवडला असेल. अशाच एका विषयासह पुन्हा भेटूया पुढील भागात.

Till then stay healthy be happy

- दीप्ती काबाडे

आहारतज्ञ