Rheumatoid arthritis.

युवा लेख

युवा विवेक    07-Nov-2023   
Total Views |

 Rheumatoid arthritis.

नमस्कार मित्रांनो! मजेत आहात ना? चला तर मग आज एका नव्या विषयाबद्दल माहिती घेऊ.

सांधेदुखी म्हणजेच arthritis, सर्वांना माहीत असेलच. याची सुरुवात पंचेचाळीस वयानंतर गुडघेदुखी ने होते. परंतु या संधिवाताचे दोन प्रकार असतात हे माहीत आहे का?

ते म्हणजे कॉमन arthritis आणि rheumatoid arthritis.

मी जास्तीत जास्त सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करते.

कॉमन arthritis आणि rheumatoid arthritis या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. कॉमन arthritis बाह्य कारणांनी होतो. म्हणजेच वजन जास्त असणे, आहारात पोषांतत्वांची कमतरता असणे, सांध्यांचा अतिप्रमाणात वापर... अशी ती कारणे आहेत. कॉमन arthritis ची लक्षणे सुद्धा खूप साधी असतात. सांधे दुखणे, कधीकधी सांध्यांना जोडणारे स्नायू दुखणे, सांध्यांची हालचाल करताना त्यातून आवाज येणे आणि वेदना होणे इत्यादी. याची ट्रीटमेंट सुद्धा सामान्य असते. औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत. नीट काळजी घेतली तर हा आजार बऱ्यापैकी "बरा" करता येतो.

आता वळूया rheumatoid arthritis कडे. हा आजार एक प्रकारचा auto-immune आजार आहे. आपल्या शरीराची immunity गल्लत करते आणि आपल्याच शरीरातील सांध्यांवर हल्ला करू लागते. याची सुरुवात कोणत्याही वयात होऊ शकते. जर याचे detection योग्य वेळेत झाले नाही तर सांधे कायमचे निकामी होऊ शकतात. आधी एखादा सांधा दुखतो आणि हळूहळू सगळ्याच सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागते.

अर्थात अशा प्रकारे सर्व सांधे दुखत जाणे हे तर कॉमन arthritis चे सुद्धा लक्षण आहे! मग दोन्ही मधला फरक कसा ओळखावा?

एक असे exclusive लक्षण आहे जे फक्त rheumatoid arthritis मध्ये दिसून येते, साध्या arthritis मध्ये दिसत नाही. ते लक्षण म्हणजे निराशा, चिडचिड, चटकन रडू येणे, भावनिक वाटणे, depressive thoughts येणे, एखाद्या क्षणी आयुष्य संपवण्याची भावना होणे...

हो, हा आजार माणसाच्या मानसिक आंदोलनावर प्रचंड परिणाम करतो. व्यक्तीला असे वाटू शकते की बाह्य कारणांनी, स्ट्रेस मुळे, एखाद्या घटनेमुळे असे depressive thoughts मनात येत आहेत आणि ती व्यक्ती या लक्षणांकडे दुर्लक्ष करू शकते. मात्र, ही सर्व rheumatoid arthritis मध्ये त्या आजारामुळे उद्भवणारी लक्षणे आहेत! म्हणूनच सांधेदुखी सोबत असे depressive thoughts मनात येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Auto immune disease असल्याने दुर्दैवाने या आजारावर ठोस असे रोग नाहीसा करणारे औषध उपलब्ध नाही. मात्र symtomatic ट्रीटमेंट ने हा आजार नक्कीच आटोक्यात ठेवता येतो. शिवाय, डॉक्टर्स काही व्यायाम सुचवतात जे नियमित करत राहिल्याने सांध्यांचे आयुष्य वाढवता येते. एखादा सांधा अगदीच वापरण्याजोगा राहिला नसल्यास तो सांधा वापरता दैनंदिन कामे कशी करावी याचे शिक्षण सुद्धा या विषयातले तज्ञ डॉक्टर देतात. त्यामुळे आयुष्य कुणावर अवलंबून राहता जगता येते.

एक nutritionist म्हणून मी एक गोष्ट सांगेन. कोणताही auto immune रोग असो, तुमची जनरल हेल्थ कशी आहे यावर त्या आजाराचे वाढत जाणे किंवा आटोक्यात राहणे अवलंबून असते. आहारात फळे, ड्राय फ्रूट, कंदमुळे, सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी, धान्ये या सगळ्याचे योग्य प्रमाणात सेवन करावे. तसेच शरीरात काही deficiency तर नाहीत ना, याचा चेक ठेवावा. Auto immune disease असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दर सहा महिन्यांनी आपल्या काही बेसिक ब्लड टेस्ट नक्की करून घ्याव्यात. जर काही deficiency आढळल्या तर त्यावर उपाय करावे. शरीरात कोणतीही deficiency नसणे, योग्य तो व्यायाम करून सांधे सुस्थितीत ठेवणे आणि उत्तम आहार घेणे या उपायांनी सांध्यांचे आरोग्य आणि आयुष्य नक्की वाढवता येते.

- दीप्ती काबाडे

Certified Nutritionist and fitness coach