चाफ्याची सावली

युवा विवेक    28-Mar-2023   
Total Views |
 
चाफा
 
सावळ सावली
रेखीव सांडली
कृष्णाची सखयी
चाफ्यात दिसली
शांत अंधारात
हलके कानात
निरामय काही
बोलली डोळ्यात
पेंगुळला बास
घोळला का श्वास
तिचे काही त्याला
यक्षरात्री भास
सावली लाजते
सावली डोलते
तृप्त अंधारात
लकेर हसते
सावळ बाधली
भ्रमित हसली
बावरी राधिका
उगा का फसली...
 
 
- अमिता पेठे पैठणकर