वेटलॉस डाएटने नुकसान होऊ शकते का???

युवा विवेक    31-Mar-2023   
Total Views |
 
वेटलॉस डाएटने नुकसान होऊ शकते का???
 
नमस्कार मित्रांनो! पुन्हा एकदा मी तुम्हां लोकांसमोर हजर झाले आहे एक कुतूहलाचा विषय घेऊन.वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या अनेक लोकांना एक प्रश्न सतावत असतो. कधीकधी त्या प्रश्नाने चिंतित होऊन ते डाएट करण्याचा विचारसुद्धा बदलतात.त्यांना एकाच गोष्टीची भीती वाटत असते.तो प्रश्न म्हणजे,


वेटलॉस डाएटने नुकसान होऊ शकते का???
या प्रश्नाचे उत्तर तुम्ही किती अतिरेककरता, किती unrealistic Target set करता आणि किती काळत्याच्या मागे लागत राहता यावर सर्वस्वी अवलंबून आहे.
एकेक मुद्दा पाहू.
१. डाएटचा अतिरेक म्हणजे नक्की काय?
कोणत्याही पद्धतीने, कितीही त्रास होत असला तरीही डाएट सुरूच ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे चडाएटचा अतिरेक! समजा तुम्ही डाएट सुरू केले आणि प्रचंड अशक्तपणा येत आहे... चक्कर येणे, बेशुद्ध होणे असे प्रकार होत आहेत. रोजच्या कामांमध्ये तुमची ऊर्जा टिकत नाही, दिवसभर झोप येते आहे... अशी कोणतीही लक्षणे जाणवून सुद्धा तुम्ही डाएट जसेच्या तसे सुरू ठेवत असाल तर तो डाएट चा अतिरेक आहे. अशा परिस्थितीत डाएट review करून आवश्यक बदल करणे अपेक्षित असते. परंतु तसे केल्याने वेटलॉस चीरेंज कमी होईल या भीतीने तुम्ही तसेच डाएट सुरू ठेवत असाल तर ती फार मोठी चूक आहे.
२. Unrealistic Target म्हणजे काय?
समजा तुम्ही तरुण म्हणजे पंचवीस किंवा तीस वर्षांचे असताना, अविवाहित असताना किंवा तुम्हाला मुलं नसताना तुमचे वजन पन्नास किलो होते. नंतर वयाच्या चाळिशीत एका मुलाची आई असताना, थोडेफार hormonal issues सहन करत असताना तुमचे वजन काही कारणांनी सत्तर किलो झाले आहे. परंतु वेटलॉस करताना तुम्ही अपेक्षा करता आहात की ते परत पन्नास किलोवर यावे. चांगली चार वर्षे वेगवेगळ्या method वापरून, माहिती असणारे सर्वप्रकार चे डाएट प्रकार फॉलो करूनही तुमचे वजन साठ किलोच्या खाली येतच नाहीय... तर समजून जा की या नव्या शरीराला, त्याच्या वयोमानानुसार आणि metabolism नुसार साठ किलो हे च नैसर्गिक वजन आहे! हे समजून न घेता जर तुम्ही आणखी strict plan, आणखी जास्त restrictions हे सर्व सतत करत राहाल तर तुमचे नुकसान होणारच!
वेटलॉस डाएट म्हणजे काही जादूची कांडी नाही की तुम्हाला हवा तो आकडा गाठता येईल! तुमच्या शरीराचा रिस्पॉन्स, वय, आधीचेकाहीआजार, सध्याअसणारेआजार, चालूअसणारीट्रीटमेंट, तुमचामानसिकतणाव, वर्कपॅटर्न, झोपेचेपॅटर्न... कितीतरी गोष्टींवर तुमचे रिझल्ट अवलंबून असतात. म्हणूनच अपेक्षा ठेवताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच अपेक्षा सेट करा. कारण अती टोकाला जाऊन केलेला वेट लॉस डाएट तुमच्या शरीरात महत्त्वाच्या घटकांची कमतरता निर्माण करू शकतो. शिवाय दीर्घकाळ जर तुम्ही अती restricted प्रकारचे डाएट करत असाल (example, Intermittent fasting, Keto diet, Paleo diet, GM diet etc) तर तुमचे metabolism प्रचंड स्लो होऊन तुम्हाला भूक न लागणे, अन्नपचन नीट न होणे,. Constipation, indigestion अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
वजन कमी करणे गरजेचे आहे... परंतु त्याहून जास्त गरजेचे आहे निरोगी राहणे.
आशा आहे की माझे मुद्दे तुम्हाला पटले असतील.पुन्हा पुढच्या भागात भेटूया असाच एखादा विषय घेऊन.
Till then stay healthy be happy
- दीप्ती काबाडे
आहारतज्ज्ञ