Acidity..!

युवा विवेक    16-May-2023   
Total Views |

 

 
Acidity
 
नमस्कार मित्रांनो! पुन्हा एकदा मी हजर आहे तुम्हा सर्वांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन. जो दैनंदिन आयुष्यात अनेकांना त्रास देत असतो. तो म्हणजे acidity! आपल्या सर्वांना कधी न कधी या समस्येचा सामना नक्कीच करावा लागला असेल. काहींना हा त्रास तात्पुरता जाणवतो. तो काही कारणांनी जाणवतो. तर काहींना रोजच हा त्रास सतावतो! अगदी काहीही खाल्ले तरीही चटकन acidity होते. डाएटच्या माध्यमातून यावर काही प्रमाणात आळा घालता येतो. मात्र हे उपाय नक्की कोणते ते पाहण्याआधी आपण acidity होण्याची वेगवेगळी कारणे कोणती हे पाहू.

१. अतिप्रमाणात किंवा अती मसालेदार पदार्थ खाणे हे अगदी कॉमन कारण आहे acidity होण्याचे. तळलेले चमचमीत पदार्थ जसे की बटाटेवडे, समोसे किंवा हॉटेलमध्ये मिळणारे काही मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यावर काही जणांना acidity होते.

२. अवेळी खाणे : ज्या लोकांना कामामुळे किंवा इतर काही कारणांनी वेळेवर भोजन करणे शक्य नसते. ज्यांना भलत्यावेळी जेवण करावे लागते. अशांना acidity पटकन होते. विशेषतः दोन वेळच्या जेवणात चार तासांहून जास्त अंतर असेल तर acidity होण्याच्या शक्यता वाढतात. शिवाय रात्रीचे जेवण साडेनऊ वाजून गेल्यानंतर ज्यांना करावे लागते त्यांना सुद्धा acidity होऊ शकते.

३. Metabolism slow असणे : चाळीशी नंतर माणसाची पचनशक्ती नैसर्गिकरीत्या मंदावते. शरीरातील सर्वच चयापचय क्रिया मंदावतात. त्यामुळे अन्न जास्त वेळ जठरात राहिल्याने सुध्दा acidity होऊ शकते. हा त्रास महिलांना जास्त प्रमाणात जाणवतो. कारण चाळीशी नंतर त्यांच्या शरीरात होर्मोनल समस्या सुद्धा होत असतात. ज्या चयापचय क्रिया आणखी मंद करतात.

४. स्त्री गरोदर असताना : अनेक स्त्रियांना पोटात बाळ वाढत जाताना हळूहळू acidity वाढण्याचा त्रास होतो. कारण जसजसे बाळ गर्भाशयात जागा व्यापत जाते आणि गर्भाशय मोठे होऊ लागते, तसतसा जठरावर आणि आतड्यांवर प्रेशर पडून जागा कमी पडू लागते. त्यामुळे अन्न घशाच्या दिशेने वर सरकते.

५. पोटाचे विकार वारंवार होणे : stomach infection किंवा इतर काही पोटाचे विकार वारंवार होत राहिल्यास पोटाचे आरोग्य बिघडून अन्नपचन बिघडू शकते. त्यामुळे सुद्धा सतत acidity होते.

आता पाहूया यावर डाएट मार्फत कसे नियंत्रण ठेवले जाऊ शकते.

१. भरपूर पाणी पिणे : हा अत्यंत सोपा आणि सर्वात स्वस्त उपाय आहे. पाणी पिण्याने जठरातील अतिरिक्त acids dilute होतात आणि यूरीन मधून निघून जातात.

२. दोन वेळच्या जेवणामध्ये फक्त दोन ते अडीच तासांचे अंतर ठेवणे : जेवण म्हणजे literally जेवण नाही. परंतु दर दोन तासांनी काही न काही खात राहिले तर acids पोटात जमा होत नाहीत.

३. एका वेळी अन्नाचे प्रमाण कमी ठेवणे : पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नका. कारण अन्नपचन होण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सुद्धा पोटात थोडी जागा शिक्कल राहणे गरजेचे असते.

४. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. रात्रीच्या जेवणानंतर किमान दोन तास तरी झोपू नका. जेवल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी हळू वेगाने चाला. यामुळे अन्नपचनास मदत होते

५. फारच त्रास झाला तर फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध प्या. त्यानेही जर फरक नाही पडला तर ओटीसी मिळणारे antacids घेऊ शकता.

६. कशानेच फरक पडत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

कसा वाटला आजचा विषय? आशा आहे की याचा उपयोग होईल. पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नव्या विषयासह.

Till then stay healthy be happy

 

- दीप्ती काबाडे

आहारतज्ञ