वजन कमी करण्याच्या टीप्स

युवा विवेक    20-Jun-2023   
Total Views |

 वजन कमी करण्याच्या टीप्स

 
नमस्कार मित्रांनो. कसे आहात? मजेत असालच! आज मी खरोखरच एक अत्यंत गरजेचा लेख तुमच्यासाठी आणला आहे. तुमच्यापैकी अनेकांना वजन कमी तर करायचे असेल, पण त्यासाठी खास वेगवेगळ्या डाएट रेसिपीज करणे, कुणाकडून खास मार्गदर्शन घेणे काही कारणांनी शक्य नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी!

आज मी तुम्हाला काही अशा टिप्स देते ज्या कुणीही फॉलो करून दर महिन्याला किमान दीड किलो वजन सहज कमी करू शकेल.

. सकाळी वेळेत ब्रेकफास्ट करणे:

सकाळचे पहिले meal किमान साडेनऊ वाजण्याच्या आधी पोटात जायला हवे. त्याच्या किमान एक तास आधी कोमट पाण्यात लिंबू आणि एक चमचा मध टाकून ते घ्या. त्यानंतर एका तासाने व्यवस्थित ब्रेकफास्ट करा. पोहे, उपमा, इडली, डोसा, अंडी, whole wheat bread, peanut butter काहीही चालेल.

. दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास कोणतेही एक फळ खा. केळी आणि आंबे वगळा.

. दुपारचे जेवण दुपारी एक ते अडीच दरम्यान करा. जेवणात एका वेळी पोळी, किंवा भाकरी, किंवा भात खा. शक्यतो पोळी ऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी ची भाकरी खा. तांदूळ पॉलिश केलेला वापरता कोणताही raw unpolished rice किंवा brown rice वापरा. जेवणात बटाटा पूर्ण वगळा, इतर सर्व भाज्या खाऊ शकता. आणि जे आवडेल ते सलाड आवर्जून खा! हे चुकवू नका.

. संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या दरम्यान चहा, कॉफी घेऊ शकता. मात्र स्नॅक्स म्हणून भाजलेले चणे, शेंगदाणे, पॉपकॉर्न, मखाने, पोह्यांचा चिवडा,सुकी भेळ यापैकी काहीतरी खा. खाकरा, ढोकळा सुद्धा चालेल.

. रात्रीचे जेवण जास्तीत जास्त साडेनऊ वाजेपर्यंत उरका. यात दुपारच्या जेवणाचे सगळे नियम पाळा. जेवल्यानंतर किमान दोन तास झोपू नका.

या सगळ्या नियमांमध्ये meal timing पाळणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. शिवाय जंक फूड, फास्ट फूड, गोड पदार्थ आणि refined sugar पूर्णपणे वगळा. गोडाचे क्रेव्हींग झाल्यास गुळाचा एखादा लहान खडा किंवा खजूर खाऊ शकता.

बाहेर जेवणे अपरिहार्य असल्यास शक्यतो साऊथ इंडियन पदार्थ (मसाला डोसा सोडून) निवडा. पंजाबी डिशेस कडे पाहू सुद्धा नका. नॉनव्हेज शक्यतो तंदुरी आणि lean protein, fish prefer करा. ग्रेव्ही टाळा. जे काही खाणार असाल त्यासोबत सलाड किंवा रायता नक्की घ्या आणि पोर्शन कंट्रोल करा.

दिवसातून एकदा किमान अर्धा तास brisk walk करा. किंवा आठवड्यातून चार वेळा moderate level workout करा.

इतके नियम नियमितपणे पाळले तर वजन कमी करणे किती सोपी गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला ते कठीण एकाच गोष्टीमुळे वाटते... स्वतः वर ताबा ठेवणे आपल्याला जमत नाही!

आवडल्या का टिप्स? नक्की फॉलो करून पाहा. फायदा होईलच हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते.

आता तुमची रजा घेते. पुन्हा पुढच्या वेळी भेटूया एका नव्या विषयासह.

Till then stay healthy be happy

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ