तुझ्या स्मरणात...

युवा लेख

युवा विवेक    20-Jul-2023   
Total Views |


तुझ्या स्मरणात

 

योग याग ज्ञान ध्यान

अनंत मार्ग पसरले

रुचीवैचित्र्यानुसार

ज्याचे त्याने स्वीकारले

भासे प्रपंच करता

योग याग तो कठीण

गुह्य ज्ञानमार्ग असे

अभ्यासूनही जटील

मार्ग स्मरणाचा सोपा

सद्गुरू माऊली दावीते

द्वारकाधीश पांडवा घरी

माझी ज्ञानाई सांगते

चालून भक्तीपंथ देवा

तुझे स्मरण करतो

अगा चालता चालता

मी माझाच नुरतो

तुझ्या स्मरणात

ज्ञान प्रगटते ओठी

अहंकार जळून दिसती

आत्मज्ञानाच्याच ज्योती

अगा स्मरण करता

सारा देह वितळला

आणि चरणांशी तुझ्या

माझा जीव तेजाळला...

- अनीश जोशी.