मोल

युवा कविता

युवा विवेक    31-Aug-2023   
Total Views |

मोल

ज्याला सारे काही

जन्मजातच मिळाले

त्याला कधी का हो

मोल पैशाचे कळले

उपाशी रात्रीत जयाला

अर्धी भाकरी मिळाली

नित सर्वेशाची कृपा

एका त्यालाच कळाली

असून सारे काही

ज्यांनी काही नाही केले

दोष हतबले दैवाला

त्यांनी आळसाने दिले

जयांनी शून्यातून

जग मोठे उभारले

अस्तिकाचे दिवे

फक्त त्यांनाच दिसले

जो पाऊल टाकतो

दैवाची तया साथ

बाकी सारे दाखवीती

दोषारोपाचाच हात

- अनीश जोशी