शहाळ्याचे पाणी

युवा लेख

युवा विवेक    12-Sep-2023   
Total Views |

शहाळ्याचे पाणी

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खूप दिवसांनी पुन्हा भेटतो आहोत आपण. आज एका अशा विषयावर आपण बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती तर आहे, प्रत्येकाला त्याची आवड सुद्धा नक्कीच आहे. मात्र तरीही त्याचे सर्व गुण अनेकांना माहीत नाहीत. ती गोष्ट म्हणजे शहाळ्याचे पाणी.

समुद्रकिनारी असणारी गावे, जसे की कोकण आणि दक्षिण भारतातील राज्ये, या ठिकाणी नारळाची झाडे अगदी मुबलक प्रमाणात आढळतात. घरोघरी खाद्यपदार्थ बनवताना नारळाचे तेल वापरले जाते. ओले आणि सुके खोबरे पदार्थांत वापरले जाते. परंतु हेच नारळ जेव्हा कच्चे असतात तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात पाणी असते. या नारळाला आपण शहाळी म्हणतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना शहाळ्याचे पाणी आवडते. उन्हाळ्यात शहाळ्याचा खप खूप वाढतो. तर आता आपण पाहूया सर्वांना आवडणारे हे शहाळ्याचे पाणी किती गुणकारी आहे.1. हृदयासाठी: ज्यांचे bad cholesterol वाढलेले असेल अशांसाठी शहाळ्याचे पाणी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करते. दिवसातून एकदा एक ग्लास नारळाचे पाणी प्यावे.

2. डायबेटिस कमी करण्यासाठी: शहाळ्याचे पाणी अनेक electrolyte ने समृद्ध असते. त्यातील महत्त्वाचे electrolyte म्हणजे पोटॅशियम. यामुळे type 2 डायबेटिस असणाऱ्यांच्या शरीरात insulin sensitivity वाढण्यास मदत होते. मात्र शहाळे व्यवस्थित कच्चे म्हणजेच नुसते पाणी असणारे निवडावे. मलई किंवा खोबरे असणारे शहाळे निवडू नये.

3. पचनशक्ती सुधारण्यासाठी: शहाळ्याचे पाणी natural detoxification drink प्रमाणे काम करते आणि शरीरातील toxins बाहेर फेकण्यात मदत करते. त्यामुळे metabolism सुधारून अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

4. किडणी स्टोन दूर करण्यासाठी: किडणी स्टोन जर लहान आकाराचा असेल तर रोज शहाळ्याचे पाणी प्यायल्याने तो पडून जातो. मात्र जर मोठ्या आकाराचा स्टोन असेल तर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

5. आजारी व्यक्तीला recovery phase मध्ये: एखादी सर्जरी झाल्यानंतर पहिले दोन दिवस जेव्हा कोणतेही सॉलिड अण्णा खाण्यास मनाई असते तेव्हा सूप, डाळ, आमटी, ज्यूस यांच्यासोबत शहाळ्याचे पाणी एक उत्तम अण्णा आहे. इतरही कोणत्याही आजारात जर अन्न खाणे कठीण वाटत असेल तर शहाळ्याचे पाणी रुग्णाची शक्ती टिकवून ठेवते.

6. Pregnancy मध्ये: गरोदर स्त्रियांसाठी शहाळ्याचे पाणी खूप गुणकारी आहे. मात्र जर स्त्री चे वजन खूप जास्त असेल तर सहाव्या किंवा सातव्या महिन्या नंतर शहाळ्याचे पाणी पिणे बंद करावे.

7. वेट लॉस साठी: हो, नक्कीच वजन कमी करण्यासाठी शहाळ्याचे पाणी मदत करू शकते. मात्र तरच, जर तुम्ही कोल्ड्रिंक्स, गोड चहा, कॉफी यांना शहाळ्याच्या पाण्याने replace करत असाल. अन्यथा काहीही फायदा होणार नाही. जर तुम्ही चहा, कॉफी कधीच घेत नसाल तर तुम्हाला शहाळ्याचे पाणी पिऊन वेट लॉस मिळणार नाही.

इतके सगळे फायदे पाहून झाल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच उभा राहिला असेल की याचा एकही दुष्परिणाम नाही का?

दुष्परिणाम म्हणता येणार नाहीमात्र एका रोगामध्ये तुम्ही शहाळ्याचे पाणी पिऊ शकत नाही. तो रोग म्हणजे kidney failure. हो, जर किडणी फेल झाली असेल, खराब झाली असेल, डायलिसिस सुरु असेल तर शहाळ्याचे पाणी पिऊ नये. कारण यात असणारे salts किडणी ला फिल्टर करणे जमणार नाही.

इतर कोणत्याही आजारात योग्य प्रमाणात शहाळ्याचे पाणी पिऊ शकता.

आशा आहे की आजचा विषय तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटू पुढच्या भागात, एका नव्या विषयासह.

Till then stay healthy, be happy

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ