उजळत जाणारं शेडिंग एखादं लहान मूल चित्र काढतं, तेव्हा ते उठून दिसावं, सुंदर व्हावं म्हणून ते दोन सारख्या रंगांची मिसळण करु बघतं. ज्याला आपण शेडींग म्हणतो. 'शेडिंग ' करण्याची उत्कट आस व त्याहूनही जास्त म्हणजे शेवटी जे काही फलित मिळणार आहे, जी सुंदरता आपल्या दृष्टीतील ..
माणूस आणि माती माणूस आणि माती ह्यांचं अविभाज्य नातं अनेकानेक शतकांपासून, नव्हे नव्हे, युगानुयुगांपासून फुलत आलं आहे. या सर्वांगसुंदर नात्याची अतूट विण माणसाच्या वाढत्या प्रगल्भतेबरोबर नित्य दृढ होत जाते ही साक्ष आहे इतिहासाची ! ज्या मातीत माणूस जन्मतो, जगतो, ..
संगीत - एक दिव्यानुभूती ! अंतःकरणातून कंठामधे आणि कंठातून मुखावाटे स्वर उमलण्याआधी सुरू होतो तो तंबोरा! ते संगीत! तो नाद! आणि संगीत हेच अनादी आहे अगदी तंबोर्याच्या त्या सुरासारखं. तो नाद आधी निर्माण झाला आणि मग आपण आलो. जणू त्या एकमेवाद्वितीय नादाचा परमोच्च आनंद अनुभवण्यासाठीच..
थकलेल्या अंधाराला, उजेडाचा स्पर्श हवा... 'थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा...' या दासू वैद्यांच्या ओळी वाचून आपण स्तब्ध होतो क्षणभर. अंधाराला लागलेली उजेडाची आर्तव्याकूळ तहान आपल्याला हवीशीच वाटते हे खरंय; पण 'थकलेला' हे अंधाराच्या अलिकडे ठेवलेलं एक विशेषण फारच विशेष वाटतं. चिंतनीय ..
डबक्यातल्या डरकाळ्या! (तुमच्या आमच्या!!)किती खुश असतो आपण आपापल्या डबक्यात! डराव डराव करत अगदी आनंदात आणि खरंतर फार फार मोठ्या भ्रमात साजरे करत असतो, आपापल्या संकुचिताचे हवेहवेसे उत्सव. नकोच असतं आपल्याला आपले कोष तोडणं आणि बाहेरचं नवं आणि कदाचित फार फार मोठ उबदार उन्ह.. ते सोसणं तर दूरच, ..
तुमचे आमचे विवेकानंद म.म. देशपांडे आपल्या एका कवितेत अगदी सहजरीत्या म्हणतात, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण! आणि वाटतं, या ओळींचं मुर्तिमंत जीवंत उदाहरण म्हणजे विवेकानंद! कारण काहींना लागते अशी तहान, जन्माने ..
तुळशीचे बनी तुळशीचे बनी जनी उकलते वेणी... एका चैतन्यमयी प्रभाती, कोवळ्या रवीकिरणांसोबतच आली होती ती, त्या वनामध्ये. या वनामध्ये ना होती भिती वन्य पशूंची ना वन्य वृत्तींची. अथांग अशा समुद्रातील लाटेला यावसं वाटावं किनाऱ्यावर आणि त्यासाठी तिनं उसळावं, शून्यावस्थेप..
अंधारातले उजेड अंधाऱ्या अदृश्य पटलावर, फिरवले जातात सहज रंगांचे संमोहक स्ट्रोक्स... त्यांची हवीशी वीण, त्यातलं गुंतणं, गुरफटणं, तुटणं, रंगांचं परस्परांत मिसळून जाणं, अचानक विलग होणं, किती किती छटा तरळत राहतात अखंड. स्वप्नांची अशी जादू किती सहज असते! जादूचा ..
नागपंचमी - काही नवे अन्वय! भारतीय सणांच्या आरंभाचा मंगल पर्वकाळ म्हणजे श्रावण! संस्कृती परंपरांच्या सौंदर्यात्मक जागरणाचा श्रावण म्हणजे शंखनाद! श्रावणाची चाहूल लागली की, अर्थातच पहिला सण येतो तो श्रावण शुद्ध पंचमीला - नागपंचमी! आपल्या सण उत्सवांचा थोडा तरी सखोल विचार ..
कैवल्यगान...! कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले... आता समेवरी हे कैवल्यगान आले... किती आणि काय काय लिहावं या शब्दांबद्दल, संगीताबद्दल आणि गाण्याबद्दल? हे कैवल्यगान म्हणजे खरोखरंच, कैवल्यरसाची एक उत्कट सांगितीक अनुभूतीच!! कंठातील आर्त ओळींची अनुभूती गाण्याच्या ..
कृष्ण… एक न उलगडलेलं कोडं! कृष्ण, म्हणजे एक न उलगडलेलं कोडंच आहे. ते उलगडणं खरं अतिशय सोपं आहे, सहज आहे... आणि म्हणूनच कठीण! ते आजवर उलगडंही अनेकांना; पण भक्तांच्या मांदियाळीतील ते अगदीच तुरळक आहेत हेही खरंच. संस्कृतीने उराशी कवटाळून ठेवलंय त्याच्या स्मरणाला, त्याला! ..