२५ जून १९९२ ला शाहरुख खान, दिव्या भारती, ऋषी कपूर अभिनित 'दिवाना' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुश्राव्य गाणी आणि दिव्या भारतीचा निरागस चेहरा यांखेरीज हा सिनेमा लक्षात राहिला, कारण ह्याच सिनेमातून बॉलीवूडमध्ये 'शाहरुख पर्व' सुरू झालं. या सिनेमा
नवा अपडेटेड व्हर्जनचा फोन, ऍलेक्सा, टॅब, नवनवी गॅजेट्स हे सगळं आपल्याला हवंसं असतंच. कधी आवड म्हणून तर गरज म्हणून तर कधी परिवर्तन म्हणून आपण ते स्वीकारतोच. काळाप्रमाणे होत जाणारे बदल, लागणारे शोध, त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग माणूस स्वीकारत जात
आज आपण एक गुजराती पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. कितीही सुगरण असलात तरी हा पदार्थ किमान एकदातरी फसलेला असेल. गुजरातमध्ये गेलात तर समजेल की खमण आणि ढोकळा हे दोन वेगळे पदार्थ आहेत. खमण बेसनपासून कर करतात आणि आपण त्याला ढोकळा म्हणतो. ढोकळा डाळी आणि तांदु
तुला माहिती आहे का, तू मला किती वेड लावतोस ते? तुला कसं कळणार म्हणा ते. तू काय? वाऱ्याचा हात धरून तुझ्याच धुंदीत लहरत असतोस. बाकी काही बघायला वेळ तर मिळाला पाहिजे ना तुला. तुझी नि माझी पहिली ओळख नक्की कधी झाली ते नाही सांगू शकणार मी, पण मला वाट
लिहायला बसलोय... बाहेर पावसाची मंद रिपरिप सुरू आहे. पाणी वाहून जातंय, पुन्हा नवीन थेंब, नवीन पाणी, नवीन वाहणं. असंच अव्याहत सुरू आहे आणि मी लिहायला बसलोय. खूप विचित्र मनोवस्थेत. नागपूरमधल्या रामकृष्ण मठातल्या त्या घुमटाखालची ती ट्रान्स अवस्था. काळाच्य
नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण साधे सोपे व्यायाम प्रकार पाहिले. जे आपण घरच्याघरी करू शकतो. आज आपण हे पाहणार आहोत की, जर तुम्हाला डायबेटीस असेल तर त्याचा वजनावर काय परिणाम होतो. डायबेटीसचे प्रकार नेमके कोणते आणि डायबेटिक रुग्णांना जर वजन कमी कर
‘इस्रो’ची जडण-घडण १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला टोकियोमध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पिकमधील खेळाचे सामने घरबसल्या लोकांना दिसावेत यासाठी तेव्हा नुकत्याच पुढे आलेल्या अवकाश विज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाचा आवाका खेळांच्या माध्यमा
विश्वातील अनेक गूढ रहस्यांचे शोध घेणाऱ्या मानवाच्या 'डोळ्यावर' सध्या गेल्या काही आठवड्यांपासून अनिश्चिततेचे वादळ घोंघावत आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते आणि वैज्ञानिक आपल्या संपूर्ण तांत्रिक क्षमता पणाला लावून ते नीट पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित हा लेख लिहीला जाईल, तोवर त्यावर उपाय सापडेल अशी आशा आहे. हे डोळे म्हणजेच "हबल दुर्बीण". नुकतंच नासाने ४ जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिवसाचं निमित्त साधत हबलने वेध घेतलेला एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. असं म्हटलं जातं की, "हबलने वेध घेतलेल्या प्रति
दोन दिवसांपूर्वी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीने तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या तीन आण्विक पाणबुड्या बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याबद्दल सूतोवाच केलं आहे. यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या तिन्ही पाणबुड्यांच्या निर्मितीत ९५% गोष्टी या 'मेड इन इंडिया' असणार आहेत. आत्मनिर्भर भारत बनण्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघण्यात येतं आहे. मुळातच अतिशय किचकट असणारं तंत्रज्ञान आत्मसात करून अश्या पद्धतीच्या पाणबुड्यांची निर्मिती करणं हे प्रचंड मोठं शिवधनुष्य पेलणं आहे. पारंपारीक पाणबुड्या आणि
नासाच्या चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने काढण्यात आलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रास्थानाच्या छायाचित्रात असे दिसून आले आहे की, त्या केंद्रस्थानी अतिउष्ण वायू आणि चुंबकीय तरंग एकमेकांत गुंफले जाऊन त्यामुळे एक अभूतपूर्व दृश्य तयार झाला आहे. हे नवे छायाचित्र चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने आधी काढलेल्या आणि आता काढलेल्या छायाचित्रांच्या एकत्रीकरणाने तयार झाले आहे. या छायाचित्रामुळे आपल्या आकाशगंगेच्या चकतीच्या वरचा आणि अधिक लांबचा भागदेखील स्पष्ट दिसू शकतो आहे.पॅनोरमा या प्रकारच्या त्या छायाचित्रात नारिंगी, निळ
समाजाच्या अंतर्मनात वेगळं स्थान निर्माण केलेली चित्रपटसृष्टी नेहमीच परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम म्हणून समोर आली आहे. आजकाल अतिप्रचलीत असा 'ट्रेण्ड' हा शब्द पसरवण्यात चित्रपटाची मुख्य भूमिका आहे. घटना कितीही जुनी असली, कोणत्याही काळातली असली, कोणत्याही
कोणत्याही कलाकाराचं आयुष्य निरखून पाहावं, तर ते चारचौघांसारखं सरळसोट का नसतं? शापित गंधर्वाचं जगणं हे त्याच्यासाठी विधिलिखित असतं की त्याने आयुष्यभर स्वतः वेगळं आयुष्य जगण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा तो परिपाक असतो? त्यातून मिळालेल्या प्रसिद्धीनंतरही जे श
आज पब जी चा जमाना आहे. एनिमेशन च्या जगात एकेमकांवर कुरघोडी करून तेच आपलं खरं आयुष्य मानणाऱ्या तरुण पिढीच्या हातातली साधन बदलली असली तरी मनोरंजनाचा हेतू तसाच कायम आहे. पण जेव्हा गेम खेळण्यासाठी कॉम्प्युटर, संवाद साधण्यासाठी हातात असणारे आय फोन नव्हते त्याकाळी मनोरंजनाची परिभाषा वेगळी होती. मनोरंजनातून समाजाला काहीतरी चांगली शिकवण देण्याचा हेतू आपल्या संस्कृतीत नेहमीच जपला गेला आहे. त्याच उद्देशाने आपल्या संस्कृतीत अनेक लोककलांचा उदय झाला. काळाच्या ओघात ह्यातील अनेक लोककला मागे पडल्या किंवा त्यांच अस्ति
सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की आंतरराष्ट्रीय संबंध हे कायम वास्तववादी दृष्टीकोनातून पाहावे लागतात, आजच्या जागतिक व्यवस्थेत विचारधारेवर आधरित आदर्शवादाला कोणतेही स्थान नाही, मग तो चीन असो किंवा इतर कोणताही देश. सध्या भारत-चीन संबंधात आलेला तणाव आपल्याला विविध परिप्रेक्ष्यातून समजून घ्यावा लागेल.भारत चीन दरम्यानच्या सध्याच्या घटना पाहू यामे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लडाखमधील पांगोंग त्सो (त्सो म्हणजे सरोवर) आणि सिक्किममधील नथूला (ला म्हणजे खिंड) या दोन भागात भारतीय आणि चीनी लष्करात धक्काबुक्की आ
'चित्रपटात जे दाखवलं जाते त्याचा प्रभाव समाजावर जास्त पडतो' की, 'समाजात जे घडत आहे त्याचे प्रतिबिंब चित्रपटात दिसतं हा' वादाचा मुद्दा आहे. पण एक गोष्ट खरी आहे की, जेव्हापासून भारतात सिनेसृष्टी उदयास आली तेव्हापासून भारतीय 'समाज आणि सिनेमा' ह्यांचा प्र
परवा, ४ जूनला आपल्या सर्वांचे लाडके अशोकमामा, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची पंच्याहत्तरी झाली. जवळजवळ अर्धशतकहून अधिक काळ, आपल्या अभिनयानं अनेक रसिकांना निखळ आनंद देणाऱ्या, या अवलिया कलावंताला ही शब्दरूपी भेट सादर अर्पण. काही
कृष्णकुमार कुन्नथ हे अगदी सर्वसाधारण वाटावं असं नाव, चारचौघांसारखं, शब्दशः नॉन ग्लॅमरस. पण या कृष्णकुमार कुन्नथ नावाच्या माणसाने अर्थात गायक केकेने ९०च्या दशकातील तरुणाईला आपल्या सुरांनी मोहवून टाकलं. ३१ मे २०२२ला केकेचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने
अभिनयातील नवरस..३. शृंगाररस - रेखा यांचा उत्सव या चित्रपटातील भूमिकेचा काही भाग श्रुंगाररसातील होता. ४. वीररस - एखाद्या साहस दृष्यासाठी महत्वाचा असणारा हा भाव. ५. अद्भुत - सुखाद्भुत किंवा दुखाद्भुत रस ! विस्मय बोधक. ६. रौद्ररस - राग दर्शवणारा भाव. ७. शांत
कसे आहात सर्व? आशा आहे की मजेत असाल आणि प्रकृतीची काळजी घेतच असाल, कारण सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आरोग्य. आपणा सर्वांना माहीतच आहे की, आरोग्य चांगले राखायचे असेल तर नियमितपणे व्यायाम करणे अत्यंत गरजेचे असते. आता काही जण असेही
कोरोना आल्यापासून सर्व जगाचे लक्ष सूक्ष्मजीवशास्त्राने वेधून घेतले आहे. सॅनिटायझेशन, आयसोलेशन यांसारख्या पुस्तकी संज्ञा रोजच्या संभाषणात वापरल्या जात आहेत. कोरोनामुळे विज्ञानाच्या पुस्तकात बंद असलेली माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली, त्यांना स्वच्छत
नवल वाटले ना? हा काही पदार्थ नव्हे त्यावर लेख लिहायला पण तसं नाहीये. हा यावर्षीचा म्हणजेच २०२२चा पहिला लेख म्हणून हा पदार्थ निवडला. गेली दोन वर्षे आपल्या सर्वांचेच आयुष्य एका दुष्ट विषाणू आणि आजाराभोवती फिरतेय. प्रत्येक हिंदू पूजेत पंचामृताचे किती महत्त्