शहाणी आणि उनाड झाडे..बाहेर पौर्णिमेचे चांदणे पडले आहे. शहरात रात्री रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे चांगले लांबपर्यंतचे दृश्य डोळ्याला सहज दिसते आहे. शहर आणि गाव यात बराच फरक असतो. पण तो फरक संस्कृतीत, वागण्या-बोलण्यातला असावा. त्या झाडाकडे पाहून मला फारसा फरक जा..
आनंदाचे संमेलन..पावसाची, माणसाची आपल्याला चाहूल लागते आणि मन तेव्हाच सुखावलेलं असतं. काही जण गंमतीने त्याला 'वेध लागणे ' असेही म्हणतात. असेच वेध 'विवेक'च्या नुक्कड साहित्य संमेलनाचे कितीतरी दिवस आधीच साहित्यप्रेमींना लागले होते. काही वास्तू कायमच आपल्याला त..
अडथळ्यांची शर्यत.. हल्ली तू खूप बिझी झाला आहेस हे वाक्य बरेचदा आपल्याला कुणीतरी ऐकून दाखवतंच. अगदी जवळचं माणूस असलं किंवा खास मैत्री असली म्हणजे, 'गरीबाकडे बघायला तुला वेळ नाही.. आता तू श्रीमंत झालास वगैरे प्रेमळ टोमणे देखील ऐकायला मिळतात. पण खरंच हल्ली प्रत्येकजण ..
अलिप्त.. अलिप्त या शब्दाचा शब्दकोषात अर्थ आहे. या शब्दाची व्युत्पत्ती कोषात व्युत्पत्ती देखील दिलेली असेल. पण आपल्या जगण्यात या अलिप्त शब्दाला सार्थ स्थान देणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. अलिप्त या शब्दाचा अर्थ अलग असा असून तो संस्कृतोत्पन्न आहे. हे असं ..
थंडीची चाहूल.. निसर्गाशी सारी सजीव सृष्टी जोडलेली आहे. पण या सजीव सृष्टीतही पशुपक्ष्यांची निसर्गाशी खास अशी मैत्री आहे. सहा ऋतूंचे स्वागत पशुपक्षी मोठ्या उत्साहाने करतात. त्यातल्या त्यात कार्तिक संपताना लागणारी थंडीची चाहूल आपल्यापेक्षा या पशुपक्ष्यांना ..
खाऊची गोष्ट.. शहाण्यासारखा वागलास तरच खाऊ मिळेल, हे वाक्य आपण लहानपणी ऐकलेलं असतं. शहाण्यासारखं वागून कित्येकांनी तो खाऊ पटकावलाही असेल.. म्हणजेच 'खाऊ' नावाच्या गोष्टीची ओळख आपल्याला अगदी बालपणीच होते. बालपणी अनेक लोक आपल्याला खाऊ देत असतात. कुणी बिस्कीट, ..
आधी केलेचि पाहिजे! भाषा ही जननी आहे , हे वाक्य आपण कित्येकदा वाचले आहे आणि ऐकलेही आहे. कदाचित भाषेविषयी निबंध लिहिताना ते कुणी दहावीच्या परीक्षेत लिहून निबंधाला शोभाही आणली असेल. पण निबंधाला शोभा आणण्यापुरतीच भाषेतील अशी काही वाक्ये वापरावीत, एवढीच आपली ..
वाटले जसा फुलाफुलात चाललो..परवाच एका कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात कवी अनिल यांची 'वाटेवर काटे वेचीत चाललो..' ही कविता कुणीतरी सादर केली. कविता लिहणे आणि सादर करणे यात तसा बराच फरक आहे. कविता लिहता आली तरी सादर करता येतेच, असे नाही. सादर करण्यात एक कौशल्य असते. त्या क..
आपलं माणूस..माणूस हा तसा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या भावभावना, विचार, नवनवीन गोष्टी कुणाला तरी दाखवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तसेच, इतरांच्याही अशाच नव्या गोष्टी जाणून घ्यायला त्याला आवडतं. हे शेअरिंग किंवा आवडी-निवडीच्या पलीकडेही त्याला समाजाची गरज ..
भाषेची समृद्ध जडणघडण.. तोंडावाटे बाहेर पडणारा ध्वनी म्हणजे भाषा.. अशी सोपी भाषेची व्याख्या आहे. पण तोंडावाटे बाहेर पडणा-या ध्वनींना अर्थ असतो. त्या अर्थामुळेच त्याला भाषेचे रुप प्राप्त होते. दिवसभरात कितीतरी अक्षरे, शब्द नि वाक्ये आपण बोलतो. मन आणि मेंदू ..
गंध गेला रानावना... परवा एका बंगल्याजवळून जाताना प्राजक्ताच्या फुलांचा गंध आला. तिथे प्राजक्ताचं झाड मला दिसलं नाही. बहुतेक, ते झाड बंगल्याच्या मागच्या दाराजवळ असावं.. पण त्या गंधाचा छान दरवळ अगदी दूरवरही येत होता. मुळातच, कुठेही फुले पाहिली म्हणजे मला ..
स्वप्नीच वेध घ्यावा.. स्वप्न म्हणजे माणसाच्या जगण्याची आशा.. ज्या 'उद्या' नावाच्या गोष्टीनी माणसाला 'आज'चा विसर पडावा.. अशी गोष्ट म्हणजे स्वप्न.. स्वप्नाची अशी व्याख्या करता येईल. पण स्वप्न मुळातच कुठल्या व्याख्येत किंवा साचात बसवता येत नाही. ते मुक्त असतं. या मुक्तपणामुळेच..
खुशाल ठेवा नावे ! हल्ली निमंत्रण पत्रिका मोठ्या आकर्षक असतात. लग्न आणि मुंजीच्या पत्रिकांचे निरनिराळे प्रकार आपण पाहत असलो तरी प्रत्येकच पत्रिकेत काही ना काही वेगळेपण जाणवते. पत्रिकेवर छायाचित्रेसुद्धा छापली जातात. पण हल्ली मोबाईलवर एकमेकांना पत्रिका सहज पाठवता ..
सामाजिक डिप्रेशन.. गेल्या आठवड्यात एका मानसोपचार तज्ज्ञ मित्राच्या दवाखान्यात जाणे झाले. त्या मित्राचा आणि माझा एक दुसरा मित्र काही कारणाने डिप्रेशन मधे गेला होता. त्याच्याबरोबर म्हणून मी त्या दवाखान्यात गेलो होतो. तिथे आणखीही काही जण केवळ डिप्रेशनच्या कारणामुळे ..
आयुष्य बहरते फुलांनी.. मध्यंतरी एका नर्सरीत जाणे झाले. नर्सरी म्हटलं की, तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोपटी, झाडांचे निरनिराळे प्रकार आणि जवळपास सगळ्याच झाडांची नावे पाठ असणारी दोन माणसे आणि भरपूर ऑक्सिजन असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण ही नर्सरी फक्त फुलझाडांची होती. ..
रील ते रिअलसोशल मिडीया आता मानवाच्या रोजच्या जगण्यातील एक आवश्यक घटक आहे. आपले विचार एकाच वेळी हजारो लोकांसमोर व्यक्त करण्याचे हे साधन आहे. अनेकजण आपले विचार मांडत असतात. काही जण साहित्य पोस्ट करतात, काही जण एखाद्या घटना व प्रसंगाविषयी आपले मत मांडत असता..
निसर्गाच्या कुशीत आणि खुशीत.. निसर्गात असणारे निरनिराळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. या एकमेकांच्या गरजेपोटी म्हणा किंवा गरजेपोटी असलेल्या नात्यामुळे म्हणा पण निसर्ग अजून तसा ब-यापैकी टिकून आहे. मानव, झाडे-वेली, आकाश, डोंगर, जमीन, पाणी, पशु-पक्षी वगैरे सर्व घटक मिळून ..
गरज आणि उपभोगाची साधने.. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज आधी संपते तो तुम्हाला सोडून जातो." ही वपुंनी केलेली आयुष्याची व्याख्या. ही व्याख्या सार्थ आहे. पण अलीकडच्या काळात आयुष्य आणि गरज यातील अंतर अगदी जवळ येतंय. वाढती स्पर्धा हे त्याचं कारण असलं ..
स्त्री पुरुष समानता.. निसर्गात अनेक सजीव - निर्जीव सृष्टीची नाती युगानुयुगे आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालंच तर झाडाचं पाण्याशी, आभाळाचं पावसाशी, फूलाचं फुलपाखराशी नातं आहे. ही नाती जरी गरजेपोटी निर्माण झाली असली तरी ती कित्येक युगे टिकून आहेत. ही नाती टिकण्याचा मुख्य ..
परिचित - अपरिचितपरिचित - अपरिचित.. माणसाची माणसाशी ओळख होणे, हे समाजाच्या दृष्टीने सकारात्मक असते. आपल्या भोवताली असलेल्या प्रत्येक माणसाशी आपली ओळख व्हायलाच हवी असे काही नसले तरी अगदीच अनोळखी राहण्यातही फार अर्थ नाही. पण ओळख केवळ नावाला किंवा स्वार्थासाठी नसावी. ..
प्रवासातली माणसं..प्रवासातली माणसं.. प्रवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो वळणावळणांचा रस्ता, आपल्याबरोबर धावणारा दुतर्फा दिसणारा निसर्ग, इच्छित स्थळी पोचल्यावर काय काय करायचं त्याचे विचार, पुणे-मुंबई प्रवास असेल तर कर्जतचा बटाटेवडा ... असं बरंच काही ..
मन नाजूकशी मोतीमाळ..मन नाजूकशी मोतीमाळ.. मन ही आपल्याला मिळालेली छानशी भेट आहे. आपलं मन आपल्या बरचसं ओळखीचं असतं आणि बरचसं ओळखीचं नसतंसुद्धा! रोज वेगवेगळ्या गोष्टींमुळे, घटनांमुळे आपल्याला मनाच्या या अनोळखीपणाची ओळख होत असते. ओळखीचं मन म्हणजे साद घालणारं मन.. ..
कवितेचं भावविश्व..कवितेचं भावविश्व.. कविता ही एक प्रतिक्रिया आहे. एखादी क्रिया घडते आणि त्याचे जे बरे-वाईट पडसाद उमटतात , त्या उमटणा-या पडसादातून हळूहळू कविता तयार होत असते. कवीच्या वैयक्तिक आयुष्याशी कवितेचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी कुणाचं तरी आयुष्य ..
आनंदाचं जगणं..दु:ख कुणाला नसतं? माणसालाच दु:ख आहे असं नाही. पशु-पक्ष्यांना दु:खं असतं, वृक्ष - वेलींना दु:ख असतं. या जगातल्या सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला आपापलं दु:ख आहे. आपल्याला इतरांचं दु:ख कायमच आपल्यापेक्षा कमी आहे, असं वाटतं. इथ..
चाहूल येता ओळखीची ती... चाहूल येता ओळखीची ती... प्रेम , प्रीती , प्रीत , अनुराग यासारख्या शब्दांचे अर्थ उमगू लागतात , सारे अर्थ ओळखीचे वाटू लागतात तेव्हा मनातल्या भावभावनांना मूर्त स्वरुप आलंय असं वाटू लागतं. हे सारं होतं तेव्हा कुणीतरी कुणालातरी आवडलेलं ..
न भेटलेल्या माणसांची 'भेट' ..न भेटलेल्या माणसांची 'भेट' .. बरेच दिवसांनी आपण एखाद्या समारंभाला जातो. तेव्हा आप्तेष्ट , मित्र-मैत्रीणींची भेट होत असते. किंवा ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने आपण कुणाकुणाला भेटत असतो. काहीवेळा भेटीचा विशिष्ट हेतू असतो किंवा नसतो. मग त्या ..
बोलके मौन..मौन हा शब्द आपल्याला काही नवीन नाही. अनेक कथा , कादंब-या आणि कवितात आपण तो वाचतच असतो. मौन या शब्दाचा शब्दश: अर्थ शब्दांशिवाय आपल्या भावना व्यक्त करणे. यातला व्यक्त हा शब्द फार महत्वाचा आहे. आपण म्हणतो , त्याचं मौनव्रत आहे किंवा त्याने मौन बाळगलंय. ..
जनरेशन गॅप.. बदल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नवीन बदल स्वीकाराणं म्हणजे अधुनिक होणं , ही जगण्याची व्याख्याच झाली आहे. कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते स्वीकारायचे नाहीत हे व्यक्तिपरत्वे भिन्न असले तरी बदल स्वीकाराण्याच..
शुद्धता आणि पावित्र्य.. शुद्धता आणि पावित्र्य या दोन शब्दांच्या मधे आणि हा शब्द लिहावा, की विरुद्ध हा शब्द लिहावा हे माझं अजूनही निश्चित झालेलं नाही. सध्या आपल्या अवतीभवती असणा-या शुद्ध सोशल मिडीयावरच्या पवित्र संदेशांनी, भोवताली असणाऱ्या व्यक्तींच्या मतामतांतरामुळे ..
तेजोवलय.. ईश्वराची सर्वांत सुंदर निर्मिती म्हणजे निसर्ग आणि माणूस. सारी सजीव सृष्टी ईश्वराने निर्माण केली. आता जगाची लोकसंख्या अब्जावधी आहे. तरीही एका माणसाचा स्वभाव दुस-या माणसासारखा नाही. दृष्टी, दृष्टिकोन यात जुळ्या मुलांतही फरक आढळतो. हे निराळेपण असल्यामुळेच..
गुंफण आठवणींची... आठवण म्हणजे एखादा प्रसंग, एखादा दिवस आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आठवणीचा प्रभाव जसजसा वाढत जाईल, तसतसं आणखी आपण त्या आठवणीत रमायला लागतो. काही वेळाने तर ती आठवण आपण मनातल्या मनात अगदी जशीच्या तशी जगायला लागतो. आठवणींचं एक मात्र आहे की, ती कधी ..
जल्लोष.. नुकतीच गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी पार पडली. बाप्पाला निरोप देताना दु:ख कुणाला होणार नाही ! पण अगदी कुठलीही व्यक्ती आपल्या घरातून बाहेर पडताना आपण हस-या चेह-यानेच त्याला अच्छा करतो. मग गणपती म्हणजे प्रत्यक्ष देवच. त्याला निरोप देताना ..
वयाचे बंधन नाही! प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात आपला वाढदिवस ही आनंदाची पर्वणी असते. तो सुखाचा दिवस असतो. आप्तेष्ट, स्नेही सारे त्या व्यक्तीला शुभेच्छा देतात, त्याचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस शब्दांतील 'वाढ' या शब्दाचा संबंध वयाशी आहे. वर्षाकाठी आपलं वय वाढत ..
पहिलं प्रेम... पहिल्या प्रेमावरची सर्वोत्तम कादंबरी म्हणजे 'पहिले प्रेम'. यात वि.स. खांडेकरांनी शब्दांचं अमृत शिंपल्याचा भास होतो. कादंबरीचं आणि प्रेमाचं नातं अतूट आहे. ‘पहिले प्रेम’ असं म्हटलं म्हणजे कुणाला अर्थ समजणार नाही! मुळात, प्रेम हा माणसाच्या ..
सुंदर साजिरा श्रावण! "श्रावण महिनाच विलक्षण... झाडांबरोबर मनालाही पालवी फुटते...", हे श्रावण महिन्याचं व.पु. काळे यांनी केलेलं वर्णन. याशिवाय त्यांच्याच एका लेखात किंवा कथेत, "लाजावं कसं हे श्रावण किंवा भाद्रपदानंच जगातल्या पहिल्या तरुणीला सांगितलं!", श्रावणाचं ..
आयुष्याचं वेळापत्रक परवा एक कविता वाचली, ''सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! तेच ते!” विंदांनी खरंच छान कविता लिहिली आहे. त्याच त्या जगण्याचं वास्तव नेमकेपणाने मांडलेलं आहे. कवितेच्या शेवटी विंदा लिहितात 'मरणंही तेच ते' तेव्हा वाटतं ही तुमच्या-माझ्या आयुष्यातील ..
आधुनिकता का अनुकरण ? आधुनिकता हा जगाचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक जग, आधुनिक भारत हे विषय आपण कितीदातरी ऐकले आहेत, वाचतो सुद्धा. यंत्रयुगाची सीमा ओलांडून आता आपण आणखी पुढे चाललो आहोत. यंत्रमानवासारखी आधुनिक यंत्रणा परदेशातल्या मोठ्या ऑफिसेसमध्ये वापरतात असं ऐकिवात ..
गोड गोड बोला.. नुकतीच मकरसंक्रांत झाली. इंग्रजी वर्ष सुरु झालं की अगदी पहिल्याच दिवसापासून मकरसंक्रांतीचे वेध लागतात. पहिला सण म्हणून असेल किंवा आवडता सण म्हणून असेल पण साऱ्यांच्याच उत्साहाला उधाण येतं. तीळ आणि गूळाची खास अशी 'पौष्टिक' भेट होते. त्या भेटीतून ..
मैत्री पुस्तकांशी..पुण्यात नुकताच 'पुणे पुस्तक महोत्सव' साजरा करण्यात आला. येथे महोत्सव पार पडला असेही म्हणता येईल. पण त्या महोत्सवात जुन्या -नव्या वाचकांचा स्पर्श पुस्तकांना मनापासून झाला. पुस्तक विक्रेते, वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांशी वाचकांचे नाते जुळले, अ..
वेगळं काहीतरी हवं आहे.. माणसाला आपल्याजवळ जे आहे त्यापेक्षा नेहमीच काहीतरी वेगळे हवे असते. हे वेगळे काहीतरी हवे असणे, हे प्रत्येकाच्या स्वभावात कमी -अधिक का होईना पण असतेच. वेगळे हा शब्द काही व्याख्येत बांधता येणार नाही. कुणाला वेगळे म्हणजे काय हवे हे आपण कसे सांगणार! ..
आनंद आणि समाधान.. माणसाच्या जीवनात आनंदाचं स्थान मोठं आहे. आनंद मिळण्याच्या वाटा अनेक आहेत. कुणाला कशात आनंद मिळेल, सुख वाटेल हे सांगणं अवघड आहे. पण मिळालेला हा आनंद माणूस अगदी बेभान होऊन जगतो. आनंदाच्या एखादा क्षणही दिवस चांगला जायला पुरतो. पण त्या एका ..
न लपवलेला खजिना.. बसस्टाॅपवर प्रत्येकच माणूस कधीतरी गेलेला आहे, कधी बसस्टॉपवर गेल्या गेल्या बस मिळते तर काहीवेळा बसची वाटही पहावी लागते. बसस्टॉप या जागेची गंमत म्हणजे ज्याला आपण 'ओळखीची नाती' म्हणतो ती त्या जागेवर अधिक जुळतात. बसची वाट पाहणे हा देखील ओळख होण्याचा ..
कुटुंब शब्दांचे..शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले.. हे गीत आपण अनेकदा ऐकले असेल. शब्दांशिवायही मनातल्या भावना मनापर्यंत पोहोचवता येतात, असा साधा सोपा अर्थ पाडगावकर आपल्याला या गीतातून सुचवतात. मौनातला हा भावनांचा संवाद पाहून शब्दही त्यात हळूच विरघळत अस..
साबुदाण्याची खिचडी..सोशल मिडीया हल्ली बराच 'ॲक्टिव्ह' झालाय. फावल्या वेळात पूर्वी राहिलेली वैयक्तिक कामे, वाचन वगैरे काहीतरी केले जाई. हल्ली हा फावला वेळ देखील सोशल मिडीयानी आपल्या नावावर करुन घेतला आहे. फेसबुक, ऑरकुट वगैरे माध्यमे किंवा अगदी वाॅट्सअप ॲप सारखे मा..
सुफळ संपूर्ण..नुकतीच अनंत चतुर्दशी झाली. लहानग्यांपासून अगदी वृद्ध मंडळींपर्यंत लाडका असणारा देव म्हणजे गणपती बाप्पा! या गणपती बाप्पाला नुकताच सर्वांनी वाजतगाजत पण काहीसा साश्रू नयनांनी निरोप दिला. पण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचनही त्याच्याकडून घेतले. छा..
देवता उत्सवाच्या उत्साहाची..गणपती हा शब्द उच्चारताच त्याचे मंगलरुप आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. अलीकडच्या काळात गणपती बाप्पा मुलांना कार्टून रुपात बघायला मिळाल्यामुळे लहान मुले आणि त्याच्यातील अंतर कमी होऊ लागले आहे. गणपतीच्या आपण ऐकत आलेल्या कथा अशा नवीन तंत्रज्ञानाने ट..
आपला प्रवास सुखाचा होवो.. हल्ली रस्ता ओलांडणे हे मोठे अवघड काम झाले आहे. रोज नव्या वाहनाचा वाहतूकीत समावेश होतो. माणसांना रहायला घरे पुरत नाहीत तसं वाहनांनाही आता रस्ते पुरेनासे झाले आहेत. एका गावाला जाण्यासाठी या वाहनांच्या कोंडीतूनच मी घर ते बसस्थानक असा 'प्रवास' ..
स्पर्शाचे जपलेपण...'जे शब्दांतून व्यक्त करता येत नाही, ते स्पर्शातून व्यक्त करता येतं, असं म्हणतात. ते खरंच आहे. नऊ महिने आईच्या पोटात राहणारं मूल स्पर्श नावाची भाषाच बोलत असतं. आपल्या आईला काही सांगवंसं वाटलं म्हणजे ते मूल लाडिकपणे लाथ मारतं. तेव्हा ते मूल पोटा..
पाऊस कवितांचा.. हल्ली कविता म्हटलं म्हणजे तो थोडासा कंटाळवाणा विषय लोकांना वाटतो. शायरी हा प्रकार अलीकडे अधिक लोकप्रिय झालेला आहे. इन्स्टंट या शब्दाचं महत्व वाढतंय. अखंड कविता ऐकण्याऐवजी किंवा वाचण्याऐवजी चारोळी लोकांना आवडते. आपलं म्हणणं चार ओळीत पटवून दिलं ..
नवनिर्मितीची ओढ.. मानवी जीवन इतर सजीवांपेक्षा काहीसे वेगळे आहे. भावभावना सर्वच सजीवांमधे असतात. पण त्या प्रकट करण्याची शक्ती म्हणा किंवा प्रेरणा म्हणा ती माणसाला निसर्गतः इतर सजीवांपेक्षा अधिक असते. आपल्या भावना आणि विचार तो दुस-या माणसाला कायमच वेगवेगळ्या माध्यमातून ..
गृहसखी.. शेजारच्या बंगल्यातल्या काकू नेहमीप्रमाणे आमच्याकडे चावी ठेवून बाहेर गेल्या. त्यांची मोलकरीण येऊन सगळं काम करुन चावी परत आमच्याकडे ठेवून पुढच्या कामाला गेली. पण गेले दोन-तीन दिवस ती मोलकरीण आली नाही. त्यामुळे शेवटी काकू रविवारी तिच्या ..
पाऊस आला ! " पाऊस आला ! ", " पाऊस आला!" वगैरे कोणीतरी घातलेल्या आरोळ्या गेल्या दोन-चार दिवसात नियमित ऐकायला मिळत आहेत. पाऊस आला, या अवस्थेच्या आधी जाणवणारी एक अवस्था म्हणजे चाहूल.. पावसाची चाहूल लागताच आपल्या मनात त्याच्याविषयीच्या कल्पना निरनिराळ्या ..
अपयश आणि विचार नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. लवकरच दहावीचा देखील जाहीर होईल. बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं खूप अभिनंदन आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी खूप शुभेच्छा! आपल्यापैकी अनेकांच्या परिचयातील काही मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली ..
समाधान.. सुखापेक्षाही माणसाला किंवा या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाला समाधान हवं असतं. शिक्षण, नोकरी, विवाह, मूल होणं, पैसा मिळणं, घर घेण्याचं किंवा काहीतरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होणं या आणि अशा काही बाबींमुळे माणसाला समाधान मिळतं. समाधान ही सुखामागून ..
पडद्यामागील कलाकार.. नाटक हा मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. नाटकाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. पण असं असलं तरी प्रत्येक नाटक, अभिनेता, नाटककार अगदी इतकंच नाही, तर नाट्यगृह आणि प्रेक्षकांनीदेखील आपलं एक स्वतंत्र अस्तित्व नाटकात निर्माण केलं. पूर्वीची ..
चराचरातील स्फूर्ती राम.. रामराम मंडळी! तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप शुभेच्छा! गुढीपाडवा म्हणजे नव्या उत्साहाचा, नव्या कल्पनांचा उत्सव असतो. देवाची पूजा, पंचांगाचं पूजन, कडुलिंबाची चटणी, गगनाला स्पर्श करणारी गुढी, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, एकमेकांना शुभेच्छा देणं, गोड ..
मनातला वसंत..मनातला वसंत.. माणसाचं मन संवेदनशील आहे. प्रत्येक घटनेची, प्रसंगाची ते नोंद ठेवतं. ज्याप्रमाणे माणसाचं शरीर निसर्गाशी संबंधित आहे त्याप्रमाणेच त्याचं मनही निसर्गाशी जोडलेलं आहे. मळभ असेल तर मन ताजतवानं नसतं; ..
दिशाहीन माध्यमे..पूर्वी पत्र हे लोकप्रिय माध्यम होते.आपल्याला एखादी भावना किंवा विचार दुस-या व्यक्तीपर्यंत पोचवावासा वाटला तर तो पत्रातून लोक पोचवत असत. प्राचीन काळी निरोप्या संदेशवहनाचे काम करत असे. एका गावाहून दुस-या ग..
प्रमाणभाषा आणि बोलीभाषा.. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा.. आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा मनातले विचार आणि भाव-भावना व्यक्तीपर्यंत किंवा व्यक्तीसमूहापर्यंत पोचवत असतो. त्या विचाराला, भावनेला दुसरी व्यक्ती प्रतिसाद देते, तेव्हा ते संभाषण पूर्ण होते. हे बोलणे म्हणजेच भाषा ..
तुझ्यामाझ्यातले तुझेमाझेपण...;तुझ्यामाझ्यातले तुझेमाझेपण... प्रेम हा शब्द विलक्षण आहे.. कितीतरी सूक्ष्म भावना , सूक्ष्म विचारांच्या ऐक्यातून प्रेमाचा उदय होतो. माणसाचं मन तरल आहे. या सूक्ष्म विचारांच्या , सूक्ष्म भावनांच्या विश्वात गढून जाणं हा तर त्या मनाचा आवडता ..
' लय ' भारी...' लय ' भारी... तेरा आणि चौदा तारखेला 'विवेक' चं नुक्कड आणि बालसाहित्य संमेलन झालं. अतिशय नियोजनबद्ध आणि अबालवृद्धांना आवडेल असंच हे संमेलन पार पडलं. प्रत्येक सत्राच्या शेवटी येणा-या टाळ्या पाहता सर्वांनाच संमेलनातली सर्वच सत्रे नक्की आवडली ..
संकल्पाची ऐशीतैशी..संकल्पाची ऐशीतैशी.. नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं. या नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. इंग्रजी वर्ष एक जानेवारीला सुरू होतं. इंग्रजी असो की मराठी पण नवीन वर्ष म्हटलं की नाविन्याचा उत्सव असतोच. ..
आतून येते कविता...कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक ओळी नाचू लागतात. लहानपणापासून आपण कविता वाचत आलो आहोत. पूर्वी काव्यसंमेलन , वृत्तपत्रे , मासिके आणि काव्यसंग्रह इतकीच कवितेची पोच होती. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक मार्ग कवितेला उपलब्ध झाले आहेत. पूर्वी ..
'अहो-जहो' , 'अरे-तुरे ' ..'अहो-जहो' , 'अरे-तुरे ' ... माणसाला माणसाची गरज असते. बरीचशी नाती गरजेच्या आधारावरच जोडली जातात. नातं नावाशिवायही असू शकतं. पण काही नात्यात नाव हीच नात्याची मूळ ओळख असते. आई , बाबा , दादा , ताई , पती , पत्नी इत्यादी नात्यांची नावं आहेत ..
दिवाळी अंक... दिवाळी म्हटलं म्हणजे साफसफाई , सजावट, पणती, आकाशकंदील, फराळ, पाहुणे, भेटवस्तू अशा अनेक गोष्टी आठवतात. वसुबारस, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज अशा एकेका सणाला छान उत्साह असतो घरात.. वेगवेगळ्या कविता आणि गीते यांच्या माध्यमातून ..
वरदान हास्याचे...वरदान हास्याचे... हसणं ही प्रत्येक व्यक्तीला लाभलेली एक सुंदर देणगी आहे. एखादी गोष्ट कला आहे का शास्त्र, असा आपण विचार करतो. हास्य ही कला आहे. कला म्हटलं म्हणजे ती उपजतच असावी लागते. हसता येणार नाही, असा जगात माणूस नाहीच. म्हणून हसणं हे उपजत आहे. ..
मला माणूस म्हणा... सध्या नवरात्र सुरू आहे. स्त्री शक्तीचा जागर करणारा हा नऊ दिवसांचा सण आहे. विविध प्रकारचे वेश धारण केलेल्या नवदुर्गांची पूजा या नऊ दिवसात केली जाते. राक्षसांचा, दुष्ट शक्तींचा नाश करुन देवीनी आपल्या सर्वांना वाचवलं आहे. म्हणून या नवरात्राच्या निमित्ताने ..
सौंदर्याची व्याख्या... सौंदर्य म्हणजे काय.. तर सुंदर दिसणं. कितीतरी कवींनी सौंदर्याचं वर्णन सुंदर शब्दांत केलेलं आहे. पण कवितेतलं किंवा साहित्यातलं बहुतांशी वर्णन हे शारिरीक सौंदर्याविषयी असतं. म्हणून तिथे दिसणं म्हणजे सौंदर्य ही साधी ..
गणपती बाप्पा मोरया... गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडता उत्सव. अर्थात सर्वच सण म्हणजे उत्सवच असतो. पण गणेशोत्सव हा अबालवृध्दांच्या ह्रदयाला आनंद , सौख्य आणि एक प्रकारे समाधान मिळवून देणारा उत्सव आहे. या उत्सवात उत्साहाला, आनंदाला आणि जल्लोषाला पारावार राहत नाही. आता अधुनिक ..
नातं जपणारी नाती.. नातं हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे . माणूस एकटा जगू शकत नाही. दिवसभर त्याला जशी कुठल्या ना कुठल्या वस्तूची गरज असते तशीच माणसाचीही गरज असते. माणसा-माणसात असलेला एकमेकांविषयीचा जिव्हाळा म्हणजे नातं.. या जिव्हाळ्याच्या आधारावरच ..
संभाषण कौशल्य... हल्ली अनेक पालकांची तक्रार असते. “आमचा मुलगा किंवा आमची मुलगी अजिबात कुणाशी बोलतच नाही. घरी मात्र चांगला दंगा चाललेला असतो! सुट्टीच्या दिवशी तर बघायलाच नको!" वगैरे वगैरे तक्रारी आपण नेहमी ऐकतो. विशेष म्हणजे अगदी चार-पाच वयाच्या मुलांपासून ..
शहरातला पाऊस... पावसाची कितीतरी गाणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. 'सांग सांग भोलानाथ...' सारखं बालगीत असो, अगदी अलीकडच्या काळातलं 'चिंब भिजलेले' असो; अशा कितीतरी गाण्यातून आपण सूरांचा चिंब पाऊस अनुभवला आहे. ती गाणी ऐकताना आपण पाऊस जगलोय. या गाण्यांचं आणि पावसाचं ..
"तू काय खाणार..!?" आपण एखाद्या कामासाठी म्हणून घरातून बाहेर पडतो. वाटेत एखाद्या सिग्नलला, एखाद्या चौकात इतकंच काय, तर रहदारीच्या ठिकाणी ओळखीचा चेहरा दिसतो. समोरची व्यक्ती ओळखीदखल आपल्याला हात दाखवते. हा ओळखीचा चेहरा मित्र किंवा मैत्रिण असेल तर हमखास आपण आणि ती ..
नात्याची गोष्ट , प्रेमाची गोष्ट ... माणूस दुरावणं ही आता नित्याचीच बाब झालेली आहे. अगदीच सांगायचं म्हणजे नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी या नात्यांत हे प्रमाण हल्ली फार वाढलंय! कधीकाळी या माणसाला आपण ‘आपलं माणूस’ म्हणून मिरवत होतो, ते माणूस आपलं राहिलं नाही. ही भावना ..